कार-दुचाकीची समाेरासमाेर धडक; तिघेजण गंभीर जखमी
By राजकुमार जोंधळे | Updated: February 2, 2025 22:27 IST2025-02-02T22:27:17+5:302025-02-02T22:27:46+5:30
उदगीर-लातूर महामार्गावरील घटना

कार-दुचाकीची समाेरासमाेर धडक; तिघेजण गंभीर जखमी
डिगोळ (जि. लातूर) : बिदर येथून गावाकडे जाणाऱ्या कारची आणि दुचाकीवरून हेरकडे निघालेल्या दुचाकीची समाेरासमाेर जाेराची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना उदगीर-लातूर महामार्गावर रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
पाेलिसांनी सांगितले, कर्नाटकातील बिदर येथून एक कुटुंब चामरगा (ता. शिरुर अनंतपाळ) गावाकडे कारने रविवारी निघाले हाेते. तर तीन जण एका दुचाकीवरून हेर गावाकडे जात होते. यावेळी कार आणि दुचाकीचा समाेरासमाेर अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण हाेता की, दुचाकीसह कारचे माेठे नुकसान झाले. हा अपघात डिगोळ गावानजीक रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला. घटनास्थळावरील नागरिकांनी दुचाकीवरील तिघा जखमींना उपचारासाठी एका टेम्पाेमधून उदगीर येथील रुग्णालयात पाठवले. जखमींची नावे मात्र समजू शकली नाहीत. या अपघातामुळे लातूर-नळेगाव-उदगीर महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली हाेती. शिरुर अनंतपाळ पाेलिसांनी घटनास्थळी येत वाहतूक पूर्ववत केली.