कार-ट्रॅक्टरची धडक; एक जण गंभीर जखमी; लातूर-जहिराबाद महामार्गावरील घटना
By राजकुमार जोंधळे | Updated: February 14, 2025 23:45 IST2025-02-14T23:42:52+5:302025-02-14T23:45:04+5:30
जखमीला उपचारासाठी लातूर येथे पाठविल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली.

कार-ट्रॅक्टरची धडक; एक जण गंभीर जखमी; लातूर-जहिराबाद महामार्गावरील घटना
केळगाव (जि. लातूर) : भरधाव कार आणि ट्रॅक्टरची समाेरासमाेर जाेराची धडक झाली. यामध्ये कारचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना लातूर-जहिराबाद महामार्गावरील लांबाेटा (ता. निलंगा) गावानजीक शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. जखमीला उपचारासाठी लातूर येथे पाठविल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली.
लातूर-जहिराबाद महामार्गावर लांबाेड ते निलंगादरम्यान शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कार (एम.एच. १४ के.बी. ७५९९) निलंगा येथून लांबोट्याच्या दिशेने जात होती. दरम्यान, ऊस वाहतूक करणारा रिकामा ट्रॅक्टर निलंगा शहराच्या दिशेने जात होता. या दाेन्ही वाहनांची समोरासमोर जाेराची धडक झाली. या अपघातात कारचा समाेरील भाग चेंदामेंदा झाला असून, ट्रॅक्टर रोडलगत पडला. लातूर-हैदराबाद महामार्गावर झुडपे वाढल्यामुळे अपघाच्या घटना घडत आहेत. याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.