उदगीर तालुक्यात बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल; तिघा डाॅक्टरांना बजावली नाेटीस

By राजकुमार जोंधळे | Published: August 9, 2022 06:49 PM2022-08-09T18:49:58+5:302022-08-09T18:52:36+5:30

७ आणि ८ ऑगस्टरोजी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले होते.

Cases filed against bogus doctors in Udgir taluka; The three doctors were warned | उदगीर तालुक्यात बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल; तिघा डाॅक्टरांना बजावली नाेटीस

उदगीर तालुक्यात बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल; तिघा डाॅक्टरांना बजावली नाेटीस

Next

उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील बोगस डॉक्टरांविरुद्ध जिल्हाधिकारी लातूर यांच्या आदेशानुसार उदगीर तहसील कार्यालयाच्या पथकाने केलेल्या कारवाईत गुडसूर आणि शिरोळ येथील प्रत्येकी एका डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हंडरगुळी आणि दावणगाव येथील डॉक्टरांच्या रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आल्या आहेत, असे उदगीर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने मंगळवारी सांगण्यात आले. 

उदगीर तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार आजादी का अमृत महोत्सवनिमित्त उदगीर तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम राबवण्यासाठी उदगीर येथील तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली कार्यवाही कृती समितीची बैठक ४ ऑगस्टरोजी तहसील कार्यालय येथे घेण्यात आली हाेती. बैठकीत उदगीर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ७ आणि ८ ऑगस्टरोजी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले. या पथकाने हंडरगुळी येथील दोन, गुडसूर येथील एक, शिरोळ येथील एक आणि दावणगांव येथे कारवाईसाठी पथक धडकले. दरम्यान, बोगस डॉक्टरांच्या दवाखान्याला भेट देऊन शिरोळ आणि गुडसूर येथील डॉक्टराविरुद्ध उदगीर ग्रामीण आणि वाढवणा पाेलीस ठाण्यात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तर हंडरगुळी येथील दाेघे आणि दावणगाव येथील एका बोगस डॉक्टरांच्या दवाखान्याला पथकाने भेट दिली. मात्र,  हे दवाखाने बंद असल्याचे आढळून आले. या दवाखान्याच्या प्रमाणपत्र पडताळणीबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. असे नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर यांनी सांगितले.

Web Title: Cases filed against bogus doctors in Udgir taluka; The three doctors were warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.