दिवसाढवळ्या माेबाईल हिसकावणाऱ्या चाैघांना पकडले
By राजकुमार जोंधळे | Published: June 7, 2023 07:32 PM2023-06-07T19:32:15+5:302023-06-07T19:32:50+5:30
चाेरीतील माेबाईल खरेदी करणाऱ्या पाच संशयितांनाही ताब्यात घेतले असून, दहा माेबाईल जप्त केले आहेत.
लातूर : विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत माेबाईल हिसकावत पळ काढणाऱ्या टाेळीतील चाैघांना पाेलिस पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करत बुधवारी पकडले. दरम्यान, चाेरीतील माेबाईल खरेदी करणाऱ्या पाच संशयितांनाही ताब्यात घेतले असून, दहा माेबाईल जप्त केले आहेत. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लातूर शहरातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या वयाेवृद्ध, कानाला माेबाईल लावून बाेलत जाणाऱ्या, लहान मुलांच्या हातातील माेबाईल हिसकावत पळ काढणाऱ्या टाेळीतील चाैघांना विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिस पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून नवीन रेणापूर नाका परिसरात पकडले. त्यांची झाडाझडती घेतली असता, चाेरलेले, हिसकावत पळ काढलेले एकूण दहा माेबाईल जप्त करण्यात आले आहेत. शिवाय, चाेरीतील माेबाईल काही हजारात विक्री करणाऱ्या मध्यस्थांसह विकत घेणाऱ्या पाच संशयितांनाही चाैकशीसाठी पाेलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पाच संशयितांची पाेलिसांकडून चाैकशी...
सध्याला विवेकानंद चाैक पाेलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ताब्यातील संशयितांची कसून चाैकशी सुरू आहे. विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतून दिवसाढवळ्या माेबाईल हिसकावत पळ काढणाऱ्या टाेळीच्या अटकेसाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी आदेश दिले हाेते. दरम्यान, रेकाॅर्डवरील आराेपींचा, टाेळींचा पाेलिस पथकांकडून शाेध घेतला जात हाेता.
नंबर प्लेट मुदडल्याने पाेलिसांना आला संशय...
बुधवारी लातुरातील गंजगालाई परिसरात एका दुचाकीची नंबरप्लेट मुदडलेली दिसून आली. या दुचाकीवर पाेलिसांचा संशय बळावला. त्या दुचाकीवरील पाेरांना पाेलिसांनी हटकले असता, ते गाेंधळून गेले. काही कळायच्या आतच त्यांनी धूम ठाेकली. पाेलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि नवीन रेणापूर नाका परिसरात चारजणांना पकडले.