संजय व गंगाधरला समोरासमोर बसवून करणार सीबीआय चौकशी; फसवणुकीच्या गुन्ह्याची देशभर व्याप्तीचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 07:28 AM2024-07-07T07:28:45+5:302024-07-07T07:29:53+5:30

गुणवाढीचे आमिष दाखवून  फसवणूक करणाऱ्या या प्रकरणातील गंगाधर म्हाेरक्या असल्याचे आता समाेर येत आहे. 

CBI inquiry will make Sanjay and Gangadhar sit face to face regarding NEET Exam | संजय व गंगाधरला समोरासमोर बसवून करणार सीबीआय चौकशी; फसवणुकीच्या गुन्ह्याची देशभर व्याप्तीचा संशय

संजय व गंगाधरला समोरासमोर बसवून करणार सीबीआय चौकशी; फसवणुकीच्या गुन्ह्याची देशभर व्याप्तीचा संशय

लातुर : नीट गुणवाढीसंदर्भात विद्यार्थी पालकांना आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या गुन्ह्याची व्याप्ती देशभर असल्याचा संशय सीबीआयला आहे. त्यानुसार देशभरात ही यंत्रणा विविध राज्यांत सक्रिय झाली आहे. गंगाधरला आंध्र प्रदेशातून अटक करण्यात आल्यानंतर त्याचे कारनामे समाेर आले. लातुरातील गुन्ह्यात गंगाधर अन् संजय जाधव यांची समाेरासमाेर चाैकशी केली जाणार आहे. यासाठी सीबीआय गंगाधरला लातुरात आणणार असल्याचे समाेर आले.

इरण्णाची न्यायालयात धाव?

गुन्हा दाखल झाल्यापासून पसार इरण्णा काेनगलवार याने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी लातूरच्या विशेष न्यायालयात अर्ज केल्याची माहिती शनिवारी समाेर आली. त्याच्याही अटकेसाठी सीबीआयचे पथक मागावर आहे.

गंगाधरच म्हाेरक्या 

सीबीआय काेठडीतील गंगाधरने विविध राज्यांत एजंट नेमल्याची माहिती उघड झाली. त्याचे काेट्यवधींची माया जमविण्याचे  नियाेजन असल्याचे समाेर आले. त्याने किती जणांना गंडविले, याचाही तपास आता केला जात आहे. गुणवाढीचे आमिष दाखवून  फसवणूक करणाऱ्या या प्रकरणातील गंगाधर म्हाेरक्या असल्याचे आता समाेर येत आहे. 

लातूर न्यायालयातील युक्तिवाद

सीबीआयच्या वकिलांची बाजू

गंगाधर, संजय जाधव यांची समाेरासमाेर चाैकशी करण्यासाठी दाेन दिवसांची काेठडी वाढवून द्यावी.  

संशयित इरण्णा पसार आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर आणखी खुलासे होतील. चाैकशीतून इतर तपशील मिळतील. वाढीव काेठडीची गरज नाही.

आराेपीच्या वकिलांची बाजू

नांदेड एटीएस, पाेलिसांनी तिघांचे माेबाइल यापूर्वीच जप्त केले. त्यांचे बँक खाते, घराची झडतीही घेतली. त्यामुळे पुन्हा सीबीआय काेठडीची गरज नाही.

पाेलिस, सीबीआयकडून चाैकशी झाली, गंगाधर सीबीआय काेठडीत आहे. पुन्हा जाधवच्या वाढीव काेठडीची गरज नाही.

महाराष्ट्र-बिहार कनेक्शनचा शाेध 

लातुरात ठाण मांडून असलेल्या सीबीआयकडून नीट प्रकरणात महाराष्ट्र आणि बिहार कनेक्शनचा शाेध घेतला जात आहे. तपास यंत्रणांच्या हाती लागलेली दहापैकी सात ते आठ प्रवेशपत्रे बिहारमधील असल्याचे समाेर आले. 

संशयितांच्या घराची झडती घेतली असून, तपासात अनेक धागेदाेरे हाती लागल्याचे न्यायालयात सीबीआयच्यावतीने सांगण्यात आले. 
  
सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ

दाेन संशयितांना सीबीआयने शनिवारी दुपारी लातूर न्यायालयात पुन्हा हजर केले. यातील संजय जाधवच्या सीबीआय काेठडीत ८ जुलैपर्यंत वाढ केली. तर जलीलखाँ पठाणला १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली.    
 

Web Title: CBI inquiry will make Sanjay and Gangadhar sit face to face regarding NEET Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.