केंद्र सरकारने देशाची दिशाभूल केली - खरगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 04:48 AM2018-10-25T04:48:15+5:302018-10-25T04:48:17+5:30
केंद्र सरकारने जाहिरातबाजी करून देशाची दिशाभूल केली असून, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे.
औसा (जि. लातूर) : केंद्र सरकारने जाहिरातबाजी करून देशाची दिशाभूल केली असून, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. जातीय सलोखाही सरकारने संपुष्टात आणला आहे. अशावेळी संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपाला धडा शिकवा, असा हल्ला काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
काँग्रेसच्या तिसºया टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेची सुरुवात बुधवारी तुळजापुरातून भवानी मातेचे दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर आयोजित औसा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
जीव गेल्यावर दुष्काळ जाहीर करणार का? - चव्हाणांचा सवाल
मुख्यमंत्र्यांना उस्मानाबाद, लातूरमध्ये दुष्काळ कसा दिसला नाही. लोकांचे जीव गेल्यावरच दुष्काळ जाहीर करणार का? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी तुळजापुरात पत्रकारांशी बोलताना केला.