केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:19 AM2021-05-19T04:19:58+5:302021-05-19T04:19:58+5:30
रासायनिक खताची निर्मिती करणाऱ्या सर्वच कंपन्यांनी यावर्षी मोठी भाववाढ केली आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांची गरज आहे. ...
रासायनिक खताची निर्मिती करणाऱ्या सर्वच कंपन्यांनी यावर्षी मोठी भाववाढ केली आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांची गरज आहे. त्याची गरज ओळखून खत निर्मिती कंपन्यांनी दरवाढ केली. केंद्रातील सरकारने त्यावर अंकुश ठेवून सर्वच कंपन्यांना दरवाढ मागे घेण्यास सांगावे. महाराष्ट्रात रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे भाववाढीचा जबर फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. सर्वच कंपन्यांनी खताचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक वाढविले आहेत. केंद्र शासनाने कुठलीही दरवाढ मागे घेतली नाही अथवा तसे आदेशही खत कंपन्यांना दिले नाहीत. खतांचे दर ६०० ते ७०० रूपयांनी वाढले आहेत. त्या तुलनेत शेतमालाचे दर वाढले नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने खताची दरवाढ तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी उपजिल्हाधिका-यांमार्फत केंद्र सरकारकडे निवेदनाद्वारे कृषी परिषद व मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी कृषी परिषदेचे प्रदेश सचिव प्रा. विवेक सुकने, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रदीप ढगे, माजी नगरसेवक विजयकुमार चवळे, संघटक राजकुमार कानवटे, सचिव प्रा. संभाजी जाधव, कृषी परिषदेचे प्रा. भास्कर मोरे, संदीप जाधव, भरत पुंड, बी.आर. कणजे पाटील, बंडू पाटील आदी उपस्थित होते.