यंदा चापोलीचा दत्त जयंती यात्रामहोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:16 AM2020-12-23T04:16:53+5:302020-12-23T04:16:53+5:30
प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेस येणाऱ्या दत्त जन्मोत्सवाला चापोली येथील रामगीर महाराज संजीवन मठ संस्थानतर्फे दत्तजयंती यात्रा महोत्सव भरण्यात येते. मात्र, ...
प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेस येणाऱ्या दत्त जन्मोत्सवाला चापोली येथील रामगीर महाराज संजीवन मठ संस्थानतर्फे दत्तजयंती यात्रा महोत्सव भरण्यात येते. मात्र, यंदा मंगळवार, दि.२९ डिसेंबर राेजी दत्त जयंती आहे. या दिवशी भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. २३ मार्गशीर्ष नवमी ते २९ प्रतिपदा या कालावधीत सोशल व फिजिकल डिस्टिन्सिंग पाळून सप्ताह, भजन, धार्मिक विधी, अभिषेक होणार आहेत. तर पारायण, कीर्तन आणि प्रवचन हे कार्यक्रम होणार नाहीत. केवळ वीणा उभा केला जाणार आहे. सप्ताह व दत्तजन्मोत्सवानिमित्त होणारा महाप्रसाद हा यावर्षी होणार नाही.
परंपरा यंदा हाेणार खंडित...
दरवर्षी भरणारा दत्त जयंती यात्रा महोत्सव हा यंदा काेराेनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. या माध्यमातून अनेक वर्षांची परंपरा यंदा खंडित हाेणार आहे. सोशल डिस्टिन्सिंग पाळून भक्तांना दर्शन करता येणार आहे. मात्र, व्यापारी, रहाट पाळणे आणि हॉटेल व्यावसायिक, अन्य बाजार खरेदी- विक्रीसाठी मठाच्या परिसरात दुकाने लावू नयेत, कोणीही अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन रामगीर महाराज संजीवन मठ संस्थानचे मठाधीश भगवान महाराज यांनी केले आहे.