लातुरात व्यापाऱ्याला पाठलाग करत दाेन लाखांना लुबाडले!

By राजकुमार जोंधळे | Published: September 23, 2022 08:38 PM2022-09-23T20:38:35+5:302022-09-23T20:38:49+5:30

रात्रीचा थरार : चाकूहल्ला करून पैशाची बॅग पळवली

Chasing the merchant in Latur, two lakhs were robbed! | लातुरात व्यापाऱ्याला पाठलाग करत दाेन लाखांना लुबाडले!

लातुरात व्यापाऱ्याला पाठलाग करत दाेन लाखांना लुबाडले!

Next

लातूर : शहरातील गांधी मार्केट येथे असलेले दुकान बंद करून घराकडे निघालेल्या एका व्यापाऱ्याचा दाेघांनी माेटारसायकलवरून पाठलाग केला. चाकूहल्ला करून १ लाख ८० हजार रुपयांची बॅग पळविल्याची घटना उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री उशिरा घडली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे. या चाकूहल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर मार लागला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील गांधी मार्केट परिसरात असलेले इलेक्ट्रिकल दुकान बंद करून व्यापारी मदन गंगाधर बिदरकर (वय ४९ रा. वैभव नगर, लातूर) हे गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वैभव नगर येथील आपल्या घराकडे निघाले हाेते. साेबत असलेली १ लाख ८० हजार रुपयांची बॅग त्यांनी आपल्या दुचाकीला अडकवली. गांधी मार्केट येथून ते आपल्या दुचाकीवरून घराकडे निघाले हाेते. त्यांच्यावर दुचाकीवरून दाेघांनी पाळत ठेवत पाठलाग सुरू केला. ते छत्रपती शिवाजी महाराज चाैकातील उड्डाणपुलावर आले. यावेळी रहदारी कमी झाली हाेती. त्यातच उड्डाणपुलावरील पथदिवेही बंद हाेते. अंधारात त्यांना आपला काेणीतरी पाठलाग करत असल्याचा संशय आला. यावेळी त्यांनी पाठीमागे वळून पाहिले असता, काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दाेघेजण पाठलाग करत असल्याचे दिसून आले. त्या दाेघांनी जवळ येताच मदन बिदरकर यांच्या दुचाकीला धक्का मारला. यावेळी दुचाकीवर असलेल्या दुसऱ्या एकाने त्यांच्यावर चाकूहल्ला केला.

यामध्ये त्यांच्या हाताला गंभीर मार लागला. त्यांच्याकडे असलेली १ लाख ८० हजार रुपयांची बॅग आणि माेबाइलही हिसकावत दाेघांनी पळ काढला. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र, ते दाेघे अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून पसार झाले. हा थरार लातुरात रात्रीच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरून दाेघा अज्ञातांविराेधात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पाेलीस निरीक्षक प्रवीण राठाेड करत आहेत.

Web Title: Chasing the merchant in Latur, two lakhs were robbed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर