चिक्की आणि कर्ज घोटाळा जनमनात ठसवा- अजित पवार

By admin | Published: August 21, 2016 09:19 PM2016-08-21T21:19:57+5:302016-08-21T23:19:35+5:30

पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा, संभाजीराव पाटलांचा कर्ज घोटाळा गावागावात, प्रत्येकाच्या मनात ठसवा, अशी सूचना अजित पवार यांनी दिली

Chikki and loan scam: Ajit Pawar | चिक्की आणि कर्ज घोटाळा जनमनात ठसवा- अजित पवार

चिक्की आणि कर्ज घोटाळा जनमनात ठसवा- अजित पवार

Next

ऑनलाइन लोकमत

उदगीर, दि. 21 - मार्केटिंगच्या जोरावर सत्तेत आलेल्या हे सरकार भ्रष्ट आहे़ त्यांचे अनेक मंत्री भ्रष्टाचारी आहेत़ पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा, संभाजीराव पाटलांचा कर्ज घोटाळा गावागावात, प्रत्येकाच्या मनात ठसवा, अशी सूचना रविवारी उदगीर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना निशाण्यावर घेतले़
उदगीर येथे आयोजित रायुकाँच्या केडर कॅम्पमध्ये पदाधिकाऱ्यांनी रविवारी अजीत पवार यांनी मार्गदर्शन केले़ यावेळी रायुकाँ प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, निरीक्षक हरीहरराव भोसीकर, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील, प्रदेश चिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, संजय बनसोडे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, महिला जिल्हाध्यक्षा भाग्यश्री क्षीरसागर, माजी आ़शिवराज तोंडचिरकर, कार्याध्यक्ष बबन भोसले, तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे, शहराध्यक्ष समद शेख, रायुकाँ़ जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांची प्रमुख उपस्थिती होती़
यावेळी आ़ अजित पवार म्हणाले पक्षात कोणताही गैरप्रकार व बंद पाकीटाचे व्यवहार खपवून घेतले जाणार नाहीत़ तळागाळापासून पक्ष बळकट करुन जनतेसमोर योग्य पर्याय ठेवा, जनता नक्की बदल घडवेल़ मार्केटिंगच्या जीवावर निवडून आलेले मोदी सरकार जास्त काळ टिकणार नाही़ मराठवाड्यात राजकारणाची मोठी पोकळी निर्माण झाली असून याचा फायदा घेत पक्षाची ताकत तरुणांनी वाढवावी़ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वशीला नाही तर कार्य पाहिले जाते़ पक्षात तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असून प्रामाणिकपणे समोर येवून काम करा व ग्रामपंचायतीपासून पक्ष बळकट करा असा संदेश अजित पवार यांनी दिला़
शेतकऱ्यांची जगण्याची उमेद संपत असून राज्य सरकार अजुनही ठोस पावले उचलत नाही़ तिकडे केंद्र सरकार १३५ रुपये दराने डाळ आयात करते़ परंतु, शेतकऱ्यांना हमीभाव देत नाही़ अशा या शेतकरीविरोधी सरकारचे पितळ उघडे पाडण्याचे निर्देशही पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले़

Web Title: Chikki and loan scam: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.