आईच्या मदतीने मुलांनी केला वडिलाचा खून; पोलिस तपासात कळले धक्कादायक कारण

By हरी मोकाशे | Published: May 11, 2023 05:39 PM2023-05-11T17:39:38+5:302023-05-11T17:40:05+5:30

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घरावरून फेकून अपघाताचा बनाव रचला.

Children killed father with help of mother; The police investigation revealed the shocking reason | आईच्या मदतीने मुलांनी केला वडिलाचा खून; पोलिस तपासात कळले धक्कादायक कारण

आईच्या मदतीने मुलांनी केला वडिलाचा खून; पोलिस तपासात कळले धक्कादायक कारण

googlenewsNext

किनगाव (जि. लातूर) : सतत दारू पिऊन आईस त्रास देत असल्याने आईच्या मदतीने मुलांनी जन्मदात्या पित्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा मारुन आणि नाका- तोंडावर उशी दाबून खून केल्याचे चार दिवसानंतर पोलिस तपासात निष्पन्न झाले. ही घटना अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथे रविवारी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी किनगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद दाखल करण्यात आला असून तीन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

व्यंकट नारायण मरलापल्ले (४८, रा. ढाळेगाव, ता. अहमदपूर) असे मयताचे नाव आहे. ढाळेगाव येथील मयत व्यंकट नारायण मरलापल्ले हे रविवारी मध्यरात्री घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीच्या ग्रीलजवळ थुंकण्यासाठी गेले होते. तेंव्हा त्यांचा तोल गेल्याने खाली पडून मृत्यू झाल्याची माहिती मयताचा मुलगा सुरज मरलापल्ले याने दिल्याने पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

व्यंकट मरलापल्ले यांच्या मृत्यूबद्दल पोलिसांना संशय आल्याने अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली. तेव्हा मयत व्यंकट मरलापल्ले हा सतत दाऊ पिऊन पत्नी राधाबाई मरलापल्ले यांना मारहाण करीत. त्यामुळे वैतागून पत्नी राधाबाई, मुलगा सुरज व रामेश्वर हे एकत्र आले. मयत व्यंकट हे आपल्या खोलीत झोपले असता मध्यरात्री १२ वा. च्या सुमारास लहान मुलगा रामेश्वर याने कुऱ्हाडीच्या लोखंडी दांड्याने डोक्यात वार केला. पत्नी राधाबाईने पतीचे पाय धरले तर मोठा मुलगा सुरज हा छातीवर बसून उशीने नाक- तोंड दाबले. त्यामुळे व्यंकट हे जागीच गतप्राण झाले. त्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मयताचे प्रेत घरावरून फेकून देऊन बनाव रचला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोखरे यांच्या फिर्यादीवरून आई व दोन मुलांविरुध्द कलम ३०२, २०१, ३४ भादंविप्रमाणे किनगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करुन बुधवारी अहमदपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांनी सांगितले.

Web Title: Children killed father with help of mother; The police investigation revealed the shocking reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.