चिमाचीवाडी ग्रामस्थांचे ठरले, सदस्यांसह सरपंचाचीही केली बिनविरोध निवड

By हरी मोकाशे | Published: December 7, 2022 06:27 PM2022-12-07T18:27:52+5:302022-12-07T18:28:01+5:30

चिमाचीवाडी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ७ आहे.

Chimachiwadi villagers decided, the sarpanch was elected unopposed along with the members | चिमाचीवाडी ग्रामस्थांचे ठरले, सदस्यांसह सरपंचाचीही केली बिनविरोध निवड

चिमाचीवाडी ग्रामस्थांचे ठरले, सदस्यांसह सरपंचाचीही केली बिनविरोध निवड

googlenewsNext

लातूर : उदगीर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी तालुक्यातील चिमाचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे.

चिमाचीवाडी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ७ आहे. सरपंच म्हणून मीरा पंढरी दुर्गावाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच सदस्य म्हणून रामदास किशन गुंडिले, सुनंदा हरिदास चंदे, कालिंदा वामन जाधव, प्रशांत गोपीनाथ बंडे, रंजना नामदेव गुणाले, अनिल माधवराव गुरमे, मिनाक्षी प्रमोद दुर्गावाड हे बिनविरोध निवडले गेल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी जाहीर केले.

या नूतन सदस्यांचा सत्कार प्रशासनाच्या वतीने तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार संतोष गुट्टे, संतोष धारशीवकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, व्ही.आर. दंडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एम.पी. काळे, गणेश हिवरे, शंकर जाधव, तलाठी कुलदीप गायकवाड, अमोल रामशेट्टी, पवार, बाबासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Chimachiwadi villagers decided, the sarpanch was elected unopposed along with the members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.