कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक नळावर वर्तुळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:19 AM2021-08-01T04:19:20+5:302021-08-01T04:19:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील शेंद उत्तर येथील ग्रामपंचायतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनोखा उपक्रम राबवला आहे. गावातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील शेंद उत्तर येथील ग्रामपंचायतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनोखा उपक्रम राबवला आहे. गावातील सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या नळ योजनेचे पाणी भरण्यासाठी येणाऱ्यांमुळे गर्दी होऊ नये म्हणून वर्तुळ आखले आहे. त्यामुळे गर्दी कमी होण्याबरोबरच पावसाळ्यात होणाऱ्या जलजन्य आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी मदत झाली आहे.
तालुक्यातील शेंद उत्तर येथील ग्रामपंचायतीने विविध सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. पावसाळ्यामुळे जलजन्य आजारांबरोबर, साथरोग, संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सरपंच वैशाली परबत माने यांनी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादीचे विठ्ठलराव पाटील, गोविंद शेळके, परबत माने यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम सुरू केला आहे. सार्वजनिक नळ योजनेचे पाणी भरण्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची गर्दी होऊ नये म्हणून पाणी पुरवठा योजनेच्या हौदाभोवती वर्तुळ आखले आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी होणारी गर्दी कमी झाली आहे.
पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी आदी विविध आजार वाढतात. या उपक्रमामुळे स्वच्छता राखली जात असून, पाणी पुरवठ्याबरोबर रोगराईला आळा बसत आहे.
फिजिकल डिस्टन्सचे पालन...
कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्याप कमी झालेला नाही. त्यातच पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात विविध जलजन्य तसेच साथरोग उद्भवतात. त्यामुळे सार्वजनिक नळ योजनेच्या हौदाभोवती विशिष्ट अंतरावर वर्तुळ आखले आहे. त्यामुळे शारीरिक अंतर राखले जात आहे.
उपक्रमाचे कौतुक...
तालुक्यातील शेंद उत्तर ग्रामपंचायतीने सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी गर्दी होऊ नये, म्हणून राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. इतर ग्रामपंचायतींनीही अशाप्रकारचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी सांगितले.