तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी नागरिकांनी लस घेणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:19 AM2021-08-01T04:19:51+5:302021-08-01T04:19:51+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात आयाेजित काेविड-१९ आढावा बैठकीत ते बाेलत हाेते. पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच आहे. यासाठी ...

Citizens need to be vaccinated to fight the third wave | तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी नागरिकांनी लस घेणे आवश्यक

तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी नागरिकांनी लस घेणे आवश्यक

googlenewsNext

जिल्हाधिकारी कार्यालयात आयाेजित काेविड-१९ आढावा बैठकीत ते बाेलत हाेते.

पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच आहे. यासाठी लसीकरणही सुरू आहे. मात्र, नागरिकांनी नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. कोवीड १९ प्रादुर्भावाची संभाव्य तिसरी लाट प्रभावहीन ठरविण्यासाठी करण्यात येत असलेली पूर्वतयारी आणि सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला गती द्यावी, लातूर जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. केंद्राकडून आवशयक प्रमाणात लस पुरवठा उपलब्ध झाल्यावर जिल्हाभर एक गाव-एक दिवस आणि एक प्रभाग- एक दिवस असे नियोजन करून १०० टक्के लसीकरण करण्याचे उदिष्ट डाेळ्यासमाेर ठेवून जिल्हा प्रशासन, मनपा आणि आरोग्य यंत्रणेने काम करावे. राज्य आणि देशाबाहेर जाण्यासाठी लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक राज्यात प्रवेशासाठी लस घेतलेल्या नागरिकांना ॲन्टीजन टेस्ट आणि आरटीपीसीआर यासारख्या चाचण्यापासून सूट देण्यात येत आहे. तसेच अनेक शासकीय-अशासकीय संस्थांच्या योजनांसाठीही लस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.

यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, ॲड. दीपक सूळ यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

ऑक्सिजन प्लँटच्या कामाला गती द्या...

जिल्ह्यात शासकीय रूग्णांलयाच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्लँटच्या कामाला गती देण्यात यावी, त्याचबराेबर टास्क फोर्सच्या सूचनेनुसार आवश्यकतेप्रमाणे लहान मुलांचे वॉर्ड, त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची उभारणी करावी. त्याचबरोबर आयएमए आणि लातूर महानगरपालिकांच्या संयुक्त विद्यमाने लातुरात लहान मुलांसाठी जम्बो कोविड सेंटर उभारण्याबाबत कार्यवाही सुरू करावी. वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात रुग्णवाहिकांची कमतरता भासणार नाही, शिवाय त्यांचे दर नियंत्रणात रहावेत यासाठी काळजी घ्यावी, असेही पालकमंत्री देशमुख म्हणाले.

Web Title: Citizens need to be vaccinated to fight the third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.