आठ हजार स्वयंसेवकांची लातुरात स्वच्छता
By Admin | Published: March 1, 2017 05:27 PM2017-03-01T17:27:41+5:302017-03-01T17:27:41+5:30
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड यांच्यावतीने लातुरात बुधवारी तब्बल आठ हजार स्वयंसेवकांकडून स्वच्छता अभियान
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 01 - डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड यांच्यावतीने लातुरात बुधवारी तब्बल आठ हजार स्वयंसेवकांकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर दुपारी २ वाजता झाला. बाहेर जिल्ह्यातील आलेल्या आठ हजार स्वयंसेवकांनी लातुरात केलेली स्वच्छता लातुरकरांसाठी प्रेरणादायी ठरली.
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता अभियान राबविले जाते. महाराष्ट्रात सर्वत्र त्यांच्या प्रतिष्ठानकडून वृक्ष लागवड आणि स्वच्छता अभियान राबविले जात असून, त्यासाठी लातुरात प्रथमच तब्बल आठ हजार स्वयंसेवक हाती फावडे, टोपले आणि झाडू घेवून बुधवारी सकाळी दाखल झाले. लातूर शहरातील सर्वच रस्ते, चौक आणि गल्लीबोळात या स्वयंसेवकांनी स्वच्छता केली. स्वयंस्फुर्तपणे या स्वच्छता अभियानात सहभागी या स्वच्छता दुतांनी सहभाग घेतला होता.
कचरा वाहतुकीसाठी वाहन नाही...
लातुरात स्वच्छतेसाठी आलेल्या स्वयंसेवकांच मदतीला आवश्यक असणारे कचरा वाहतूक करणारे वाहन नव्हते. त्यासाठी उपलब्ध असलेल्या वाहनातून हा कचरा उचलण्यात आला. लातूर शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, रेणापूर नाका, शिवाजी चौक, बार्शी रोड, आशोक हॉटेल, गांधी चौक, गंजगोलाई, बसस्थानक परिसर, राजीव गांधी चौक परिसरात या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिम राबविली.
चारशे वाहनांची पार्किंग...
प्रतिष्ठानचे तब्बल आठ हजार स्वयंसेवक जवळपास चारशे वाहनातून लातुरात बुधवारी दाखल झाले होते. स्वखर्चातून आलेल्या स्वयंसेवकांनी या उपक्रमात आपला सहभाग घेतला होता. या वाहनांची पार्किंगची व्यवस्था ही औसा रोड परिसरात करण्यात आली होती. तेथून हे स्वयंसेवक शहराच्या वेगवेगळ््या भागात स्वच्छतेसाठी विखुरले होते.
ठिकठिकाणचे स्वच्छतादूत...
लातुरा स्वच्छता अभियान राबविण्यासाठी आलेल्या स्वच्छतादूतामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातून आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने लातुरात प्रथमच स्वच्छतेसाठी स्वयंसेवक दाखल झाले होते.