वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेचे लाक्षणिक काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:48 AM2021-01-13T04:48:49+5:302021-01-13T04:48:49+5:30

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील ५७२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा नियमित करावी. सातवा वेतन आयोग लागू करावा, अशा मागण्यासांठी वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या ...

Closing the typical work of the Medical College Medical Officers Association | वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेचे लाक्षणिक काम बंद

वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेचे लाक्षणिक काम बंद

Next

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील ५७२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा नियमित करावी. सातवा वेतन आयोग लागू करावा, अशा मागण्यासांठी वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. याच मागण्यांसाठी १ ते ७ जानेवारी या कालावधीत काळ्या फिती लावून रुग्णसेवा देण्यात आली. मात्र, त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने सोमवारी एकदिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. आनंद बरगाले, डॉ. सुमित वाघमारे, डॉ. हारणे, डॉ. लकडे, डॉ. किशोर जाधव, डॉ. कांचन भोरगे, डॉ. गजानन मोतीफळे, डॉ. स्नेहल सांगळे, डॉ. नरेश खुपसे, डॉ. राठोड, डॉ. महेश पवार, डॉ. प्रणिता पाटील, डॉ. सत्यकला गरड, डॉ. सोनवणे, डॉ. पाटील आदी सहभागी झाले हाेते.

एमएसएमटीएचा पाठिंबा...

वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या आंदोलनाला महाराष्ट्र स्टेट मेडिकल टिचर्स असोसिएशन (एमएसएमटीए) ने पाठिंबा दिला. यावेळी राज्याध्यक्ष डॉ. उदय माेहिते, जिल्हा शाखेचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे, सचिव डॉ. गणेश पवार उपस्थित हाेते. तसेच महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना (सेंट्रल मार्ड) नेही पाठिंबा दिला आहे.

कॅप्शन : लातुरातील वैद्यकीय विज्ञान संस्थेतील वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने सोमवारी काम बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. आनंद बरगाले, डॉ. सुमित वाघमारे, डॉ. गजानन मोतीफळे, डॉ. कांचन भोरगे.

Web Title: Closing the typical work of the Medical College Medical Officers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.