नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बांधावर

By राजकुमार जोंधळे | Published: September 4, 2024 08:01 PM2024-09-04T20:01:20+5:302024-09-04T20:02:54+5:30

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद

cm eknath shinde and dcm devendra fadnavis interact with farmer and inspect the damage in latur | नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बांधावर

नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बांधावर

राजकुमार जाेंधळे, उदगीर / लोहारा (जि. लातूर) : लातूर जिल्ह्यात २ सप्टेंबरसी ३२ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारातील पीक नुकसानीची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती जाणून घेतली.

शेतकऱ्यांना एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसानभरपाई दिली जाईल. राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, यावेळी झालेल्या नुकसानीच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात नुकसानभरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, क्रीडामंत्री संजय बनसोडे, माजी आ. गोविंद केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर उपस्थित होते.

Web Title: cm eknath shinde and dcm devendra fadnavis interact with farmer and inspect the damage in latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.