वैद्यकीय शिक्षकांची सामूहिक रजा; वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांवर संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 06:27 PM2022-02-04T18:27:50+5:302022-02-04T18:28:31+5:30
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संघटनेच्या शिष्टमंडळासोबत अशासकीय भाषेचा वापर केल्याचा निषेध
लातूर : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संघटनेच्या शिष्टमंडळासोबत अशासकीय भाषेचा वापर केल्याच्या निषेधार्थ विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमएसएमटीएच्या वतीने शुक्रवारी एक दिवस सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले.
यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी एमएसएमटीएचे राज्याध्यक्ष डॉ. उदय मोहिते, जिल्हाध्यक्ष डॉ. उमेश कानडे, डॉ. नंदकुमार डोळे, डॉ. विमल होळंबे, डॉ. मेघराज चावडा, डॉ. मनीषा बिरादार, डॉ. सोनल पारेकर, डॉ. अश्विनी मते, डॉ. बालाजी उकरंडे, डॉ. वैशाली वहात्तरे, डॉ. केतकी चवंडा, डॉ. अनिता पवार, डॉ. सुषमा जाधव, डॉ. शीतल लाड, डॉ. एम. एस. कराळे, डॉ. पुष्कराज बिराजदार, डॉ. नामदेव सूर्यवंशी, डॉ. राम मुंडे, डॉ. किरण डवळे, डॉ. कांबळे, डॉ. डी.एस. जाधव, डॉ. जी.बी. सुडके, डॉ. एम.एम. कदम, डॉ. एस.व्ही. काटकर, डॉ. व्ही.टी. कलशेट्टी, डॉ. एस.ए. डोपे, डॉ. उमेश लाड, डॉ. विलास साळुंके, डॉ. ऋषिकेश हरिदास, डॉ. विनोद देशमुख, डॉ. जी.बी. जाजू, डॉ. उद्धव माने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आकस्मिक सेवा सुरु...
एमएसएमटीएचे शिष्टमंडळ आपल्या न्याय मागण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना भेटण्यासाठी गुरुवारी गेले होते. तेव्हा सचिवांनी संघटनेच्या सदस्यांना अपमानित केले. या घटनेच्या निषेधार्थ आम्ही सामूहिक रजा आंदोलन करीत आहोत; मात्र आकस्मिक सेवा सुरु ठेवली आहे, असे संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. उदय मोहिते, जिल्हाध्यक्ष डॉ. उमेश कानडे यांनी सांगितले.