सण-उत्सव पार्श्वभूमीवर पाेलिसांचे काेम्बिंग ऑपरेशन; लातुरात विविध ठिकाणी नाकाबंदी...

By राजकुमार जोंधळे | Published: April 12, 2023 07:13 PM2023-04-12T19:13:02+5:302023-04-12T19:13:33+5:30

लातूर जिल्ह्यात एकाच रात्री १६ अवैध दारूविक्री प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Combing operation of the police in the background of festivals; Blockade at various places in Latur | सण-उत्सव पार्श्वभूमीवर पाेलिसांचे काेम्बिंग ऑपरेशन; लातुरात विविध ठिकाणी नाकाबंदी...

सण-उत्सव पार्श्वभूमीवर पाेलिसांचे काेम्बिंग ऑपरेशन; लातुरात विविध ठिकाणी नाकाबंदी...

googlenewsNext

लातूर : सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात बुधवारी पहाटेपर्यंत काेम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी, वाहन तपासणी माेहीम हाती घेण्यात आली. दरम्यान, फरार आराेपींना अटक करणे, लाॅजेस, हाॅटेलची तपासणी करून माेठी कारवाई करण्यात आली आहे.

मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी पहाटे ५ वाजेपर्यंत करण्यात आलेल्या काेम्बिंग ऑपरेशनमध्ये पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन करून, जिल्ह्यातील २८ अधिकारी, १२४ पाेलिस अंमलदारांची विविध पथके तयार करून, माेठ्या प्रमाणावर काेम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. लातूर पाेलिसांनी १०५ लाॅजेस, हाॅटेल्सची तपासणी केली असून, न्यायालयाकडून काढण्यात आलेल्या, सतत पाेलिसांना चकवा देत फरार असलेल्या १३ आराेपींना समन्स जाऊन अटक करण्यात आली. त्याचबराेबर जिल्ह्यात विविध २५ ठिकाणी नाकाबंदी करून, ८०२ वाहनांची तपासणी केली, तर १५ मार्गस्थळाची तपासणी करण्यात आली आहे. पाेलिसांच्या रेकाॅर्डवर असलेल्या ५९ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली, तर गुन्हा करण्याच्या प्रयत्नातील एकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध दारूचे १६ गुन्हे दाखल...
जिल्ह्यात एकाच रात्री १६ अवैध दारूविक्री प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत जिल्ह्यातील त्या-त्या ठाण्याचे पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग हाेता.

Web Title: Combing operation of the police in the background of festivals; Blockade at various places in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.