आ. बाबासाहेब पाटील यांच्या निधीतून रुग्णवाहिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:19 AM2021-04-25T04:19:12+5:302021-04-25T04:19:12+5:30

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, अहमदपूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, ...

Come on. Dedication of ambulance from the fund of Babasaheb Patil | आ. बाबासाहेब पाटील यांच्या निधीतून रुग्णवाहिकेचे लोकार्पण

आ. बाबासाहेब पाटील यांच्या निधीतून रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Next

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, अहमदपूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, डाॅ. नरवटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गुणवंत पाटील, माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, अनिल वाडकर, इलियास सय्यद, करिमसाब गुळवे, पंचायत समिती सदस्य हरिभाऊ काळे, माजी सरपंच गंगाधर केराळे, अंगद पवार, रामदास घुमे, बिलाल पठाण, प्रशांत भोसले, कोंडिबा पडोळे, गणेश जाधव आदी उपस्थित होते.

चाकूर व अहमदपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे रुग्णांना ने-आण करण्याची मोठी समस्या निर्माण होत होती. ही अडचण जाणून घेत आमदार बाबासाहेब पाटील यांनी दोन्ही तालुक्यातील रुग्णालयांसाठी रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता केली आहे. आ. पाटील यांच्या स्थानिक विकासनिधीतून चाकूर येथील ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील चापोली, नळेगाव व जानवळ या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका दिल्या आहेत. उर्वरित रुग्णवाहिका अहमदपूर तालुक्यातील रुग्णालयात देण्यात आल्या. या अत्याधुनिक रुग्णवाहिकांमुळे ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांना तत्काळ रुग्णालयात पोहोचण्यासाठी मदत होणार आहे.

Web Title: Come on. Dedication of ambulance from the fund of Babasaheb Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.