अधिकृत सावकारांकडून व्यावसायिक, शेतक-यांनी घेतले १६ कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:48 AM2021-01-13T04:48:57+5:302021-01-13T04:48:57+5:30

अनधिकृत सावकारीवर धडक मोहीम... जिल्ह्यात अनधिकृत सावकारीला आळा घालण्यासाठी उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने प्राप्त तक्रारीनुसार धडक कारवाई राबविली जाते. या ...

Commercial, farmers borrowed Rs 16 crore from authorized lenders | अधिकृत सावकारांकडून व्यावसायिक, शेतक-यांनी घेतले १६ कोटींचे कर्ज

अधिकृत सावकारांकडून व्यावसायिक, शेतक-यांनी घेतले १६ कोटींचे कर्ज

Next

अनधिकृत सावकारीवर धडक मोहीम...

जिल्ह्यात अनधिकृत सावकारीला आळा घालण्यासाठी उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने प्राप्त तक्रारीनुसार धडक कारवाई राबविली जाते. या कारवाईत अनधिकृत सावकारांच्या घर, दूकांनावरही मोहीम राबविली जाते. तसेच कारवाईत विविध कागदपत्रे जप्त केली जातात. तसेच याबाबत पुरावे आढळल्यास कायदेशिररित्या पोलीसांत तक्रार दाखल केली जाते.

जळकोट तालुक्यात कर्जवाटप नाही...

लातूर तालूक्यात सर्वाधिक २४५ सावकारांनी जिल्हा उपनिबधंक कार्यालयाकडे नोंदणी केली असून जवळपास ८०० हून अधिक शेतकरी, व्यावसायिकांना ९ कोटी ३८ लाखांचे कर्जवाटप केले आहे. तर जळकोट तालुक्यात केवळ १ जणाची नोंदणी असून त्यांनी कर्जवाटप केलेले नाही. जिल्ह्यात खरीप आणि रबी हंगामाच्या प्रारंभी खते, बियाणे आणि मशागतीसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेत असल्याचे चित्र आहे.

तालुका नोंदणीकृत सावकार कर्ज वाटप रक्कम

लातूर २४५ ९ कोटी ३८ लाख

निलंगा ९१ २ कोटी २३ लाख

देवणी ०५ ६८ लाख ५७ हजार

जळकोट ०१ ०००

शिरुर अं १४ ३७ लाख १२ हजार

चाकूर ३६ ४७ लाख ५७ हजार

रेणापूर २३ ३४ लाख २५ हजार

उदगीर २५ १ कोटी ४८ लाख

अहमदपूर २५ ६१ लाख २६ हजार

औसा २३ ४१ लाख १२ हजार

Web Title: Commercial, farmers borrowed Rs 16 crore from authorized lenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.