रबी हंगामातील तीन पिकांच्या स्पर्धेत ६ शेतकरी विभागात तर ९ जण जिल्ह्यात विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:14 AM2021-07-02T04:14:36+5:302021-07-02T04:14:36+5:30
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्या अध्यक्षतेखाली समितीत उपविभागीय कृषी अधिकारी, प्रभारी कृषी उपसंचालक तथा तंत्र अधिकारी सांख्यिकी, ...
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्या अध्यक्षतेखाली समितीत उपविभागीय कृषी अधिकारी, प्रभारी कृषी उपसंचालक तथा तंत्र अधिकारी सांख्यिकी, तंत्र अधिकारी विस्तार यांचा समावेश होता. या समितीने पीक कापणीप्रसंगी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचे उत्पादन शोधले. विभागात हेक्टरी जास्त उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांमध्ये रबी ज्वारीत सुनिता जयवंतराव पाटील, निळकंठ लिंबाजी झुंजे यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. गहू उत्पादनात विठ्ठल बळवंतराव होनराव प्रथम, किशोर दत्तात्रय कोळपे द्वितीय, श्रीमंत गावकरे तृतीय तर हरभरा उत्पादनात रवींद्र रंगनाथ कुलकर्णी यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
जिल्ह्यात प्रति हेक्टरी ज्वारीचे जास्त उत्पादन घेण्यात हणमंत भुजंगराव चव्हाण प्रथम, बाळासाहेब रावसाहेब देशमुख द्वितीय, शिवदास बाबुराव झुंजे तृतीय आले. गहू उत्पादनात बालाजी बाबुराव येडले प्रथम, अनिल बळीराम सरवदे द्वितीय, मनोहर रामराव पवार तृतीय आले. हरभरा उत्पादनात नागनाथ निवृत्तीराव सूर्यवंशी, सुशांत बन्सी चव्हाण व सूर्यकांत दत्तात्रय केंद्रे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.