शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जळकोट तहसील कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा
By संदीप भालेराव | Published: September 6, 2022 05:22 PM2022-09-06T17:22:09+5:302022-09-06T17:22:59+5:30
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी
जळकोट : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जळकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शहरातील जांब चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. जळकोट तालुक्यातील सर्व शेतकरी व नागरिकांना नियमित वीजपुरवठा करावा, जळकोट येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय मंजूर करावे, खरिपातील पिकांच्या नुकसानीची तातडीने भरपाई देण्यात यावी, रब्बी हंगामासाठी अर्थसहाय्य करावे, शेतमजुरांना रोहयोची कामे उपलब्ध करुन द्यावी, कोळनूर, वाजंरवाडा, जळकोट येथे ३३ केव्ही फिडरची क्षमता वाढविण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंदोलनात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारोती पांडे, बाबूराव जाधव, किरण पवार, बालाजी ताकबिडे, दत्ता पवार, महेश धुळशेट्टे, विश्वनाथ इंद्राळे, महेताब बेग, शिरीष चव्हाण, संग्राम कांबळे, नूर पठाण, धनराज दळवे, व्यंकटराव केंद्रे,मुज्जमिल मुंडकर, रमेश धर्माधिकारी, गोविंद कोकणे, हावगी स्वामी, जब्बार पटेल, लक्ष्मण तगडमपल्ले, बाबू हुंडेकर, सत्यवान पाटील आदींसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.