चाकुर तालुक्यात कोरोनाचा आलेख कायम, ११७६ ॲक्टिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:20 AM2021-04-27T04:20:06+5:302021-04-27T04:20:06+5:30
चाकूर : शहरासह तालुक्यात संचारबंदी असतानाही कोरोनाचा आलेख कायम आहे. १८ ते २५ एप्रिल या कालावधीत ६४७ जणांना कोरोनाची ...
चाकूर : शहरासह तालुक्यात संचारबंदी असतानाही कोरोनाचा आलेख कायम आहे. १८ ते २५ एप्रिल या कालावधीत ६४७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तालुक्यात १ हजार १७६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, रस्त्यांवरील गर्दी कमी होत नसल्याने चिंता वाढली आहे. रविवारी रात्रीपर्यंत १ हजार १७६ पॉझिटिव्ह आहेत.
तालुक्यात आतापर्यंत ३ हजार ३१४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. उपचारानंतर २ हजार ८० जण बरे होऊन घरी गेले आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये १३४ जणांवर उपचार सुरू आहेत. बाहेरील शहरात २९५ जणांवर उपचार केले जात आहेत. होमआयसोलेशमध्ये ७४७ जण आहेत. चाकूर शहरात सर्वाधिक पॉझिटिव्ह असून २६८ अशी संख्या आहे. नळेगावात ११४ पॉझिटिव्ह आढळले. लिंबाळवाडी ४३, चापोली ४०, हिंपळनेर येथे ४० पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापाठोपाठ महाळंगी २९, घरणी २७, खुर्देळी २४, जानवळ २३, कबनसांगवी २३, देवंग्रा २१, नागेशवाडी २१, लातूर रोड १९, घारोळा १९, आटोळा १८, आष्टा १७, अजनसोडा (बु) १६, सुगाव १४, शंकरवाडी १३, शेळगाव १३, सरणवाडी १२, तळघाळ १२, नांदगाव ११, झरी (बु.) ११, बोथी ११, डोंग्रज, माहुरवाडी, राचन्नावाडी, रोहिणा, ब्रम्हवाडी, उजळंब येथे प्रत्येकी १०, अलगरवाडी, देवंग्रावाडी, मोहनाळ, आंबेवाडी, मुरंबी, वडवळ (नागनाथ) येथे प्रत्येकी ९, कडमुळी ८, आनंदवाडी ८, बनसावरगाव ७, रामवाडी ७, गांजूर, हणमंतवाडी, हणमंत जवळगा, बेलगाव, हुडगेवाडी, महाळंग्रा, तिवटघाळ, मांडुरकी येथे प्रत्येकी ६, कवठाळी, रायवाडी, तिवघाळ येथे प्रत्येकी ५, जढाळा, हाडोळी, महांडोळ, मष्णनेरवाडी, शिवणखेड, अंबुलगा, तिर्थवाडी, वाघोली, भाटसांगवी, बोरगाव येथे प्रत्येकी ४, जगळपूर ३, कारखाना परिसर ३, मोहदळ ३, कुंभेवाडी, नायगाव, टाकळगाव, वडगाव, महाळंग्रावाडी येथे प्रत्येकी २ तर दळवेवाडी, धनगरवाडी, केंद्रेवाडी, शिवणी (म), उकाचीवाडी, यलमवाडी, यनगेवाडी, झरी (खु.), सांडोळ, अजनसोंडा(खु.), आष्टामोड, भाकरवाडी, बेळगाव येथे प्रत्येकी एक बाधित आहेत.
आतापर्यंत ५८ जणांचा मृत्यू...
कोरोनामुळे चाकुरात १५, नळेगाव ९, रोहिणा ३, अलगरवाडी ३, नायगाव, चापोली, रायवाडी, आनंदवाडी येथे प्रत्येकी दोन तर अजनसोंडा, आष्टामोड, नागरवाडी, जानवळ, येनगेवाडी, आटोळा, नांदगाव, बोथी, टाकळगाव, खुर्देळी, मोहनाळ, लातूर रोड, महाळंग्रा, हिंपळनेर, देवंग्रा, कडमुळी, डोंग्रज, सावंतवाडी, उजळंब, ब्रह्मवाडी या गावात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
काळजी घेणे गरजेचे...
संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु, तालुक्यात कोरोनाचा आलेख कायम आहे. सीमा सुरक्षा प्रशिक्षण केंद्रातील ८० च्या आसपास जवानांना कोरोनाची लागण झाली होती तेव्हा तिथे आवश्यक ती काळजी घेतल्यामुळे संसर्ग कमी झाला.
प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात कोविड चाचणी व उपचार यंत्रणा उभारण्यात यावी. तालुक्याच्या ठिकाणी गर्दी वाढत आहे. ती रोखली पाहिजे, असे येथील व्यापारी नारायण बेजगमवार यांनी सांगितले.
घराबाहेर पडणे टाळावे...
कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाने सहकार्य करणे आवश्यक आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये. कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यास तत्काळ चाचणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पंडगे यांनी केले.
लसीकरणाचे नियोजन...
१ मेपासून १८ वर्षांपुढील प्रत्येकास कोविड लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी नगरपंचायतीच्या सांस्कृतिक सभागृहात वेगळा कक्ष सुरू केला आहे. सर्वांनी लस घ्यावी. कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये. महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स पाळावा. सतत हात धुवावेत, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक लांडे यांनी सांगितले.