कोरोनाची भीती नाही; जिल्ह्यात ९६ टक्के रुग्ण सौम्य लक्षणाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:23 AM2021-02-25T04:23:49+5:302021-02-25T04:23:49+5:30
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. परंतु, खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने ...
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. परंतु, खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने जे नियम घालून दिले आहेत, त्या नियमांचे पालन केल्यास संसर्ग रोखण्यात यश येईल. सध्या जिल्ह्यात कधी तीन तर कधी चार टक्के पॉझिटिव्हिटी रेट येत आहे. जिल्ह्यात कोणताही नवा स्ट्रेन नाही. खबरदारी घेण्याची मात्र सक्त गरज आहे. मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे आणि वारंवार हात धुणे या बाबींचा अवलंब केल्यास १०० टक्के कोरोनाला रोखता येऊ शकते.
एका रुग्णाच्या पाठीमागे २५ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग...
रुग्ण आढळल्यानंतर एका रुग्णाच्या पाठीमागे त्याच्या संपर्कात आलेल्या २० जणांचा शोध घेतला जात आहे. संपर्कातील सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. गरज पडल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे, जेणेकरून संसर्ग होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीत ८० ॲक्टिव्ह रुग्ण...
लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत सद्य:स्थितीत ८० रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत मनपा लातूर शहर हद्दीत रुग्ण अधिक आहेत. या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने चाचण्यांवर भर दिला असून आतापर्यंत नऊ हजार ७१५ रुग्ण बाधित आढळले होते. त्यापैकी नऊ हजार ४२१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, आतापर्यंत २१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत आढळलेले एकूण रुग्ण : २४,९४७
बरे होऊन घरी परतलेले रुग्ण : २३,८९७
कोरोनामुळे मृत्यू झालेले : ७०२ सद्य:स्थितीत उपचाराधीन : ३४८.