जळकोटात सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:09 AM2021-01-24T04:09:22+5:302021-01-24T04:09:22+5:30
जळकोटमधील ५० डॉक्टर व २०० आरोग्य कर्मचाऱ्यांना यासंदर्भातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ती देण्यासाठी आवश्यक असणारी ...
जळकोटमधील ५० डॉक्टर व २०० आरोग्य कर्मचाऱ्यांना यासंदर्भातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ती देण्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ४२२ जणांना ही लस देण्यात येणार असून, ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्याचे लसीकरण येथील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार आहे. एका आठवड्यात सहा लसीकरण मोहीम घेण्यात येणार आहेत. चार आठवड्यांमध्ये पहिल्या टप्प्याचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. महिनाभरानंतर पहिल्या टप्प्याच्या लसीची दुसरी पूरक लस देण्यात येणार आहे.
तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, डाॅ. कदम, डाॅ. खंडाळे, डाॅ. डोंगरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. तीन टप्प्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे, असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.