कबनसांगवी येथे कोरोना आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:21 AM2021-04-23T04:21:27+5:302021-04-23T04:21:27+5:30
.... अवैध दारूविक्री रोखण्याची मागणी निलंगा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, केळगाव, अंबुलगा, मदनसुरी ...
....
अवैध दारूविक्री रोखण्याची मागणी
निलंगा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, केळगाव, अंबुलगा, मदनसुरी आदी भागांत अवैधरीत्या दारूविक्री करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तालुक्यातील काही गावांत संचारबंदीच्या काळात अवैधरीत्या दारूविक्री केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. ती रोखण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश लांबोटे, दत्ता काळे, पद्माकर पेठकर, अझर शेख यांनी केली आहे.
...
वन्यजीवांची पाणवठ्यातून केली पाण्याची सोय
शिरूर अनंतपाळ : दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. हे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे प्रवेश करू लागले आहेत. त्यामुळे वनविभागाने जंगलात वन्य जीवांसाठी छोटे-मोठे पाणवठे तयार करून त्यात टँकरने पाणी टाकले जात आहे. त्यामुळे प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे. सध्या उन्हाळ्यामुळे प्राण्यांना अन्न, पाणी मिळण्यास अडचण होत आहे. त्यामुळे वनविभागाने हा उपक्रम राबविला आहे. पर्यावरणप्रेमींतून समाधान व्यक्त होत आहे.