कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच; तात्काळ चाचणी करून घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:48+5:302021-07-23T04:13:48+5:30
लातूर : कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे रुग्णांनी सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी, डोकेदुखी असल्यास तात्काळ चाचणी करून ...
लातूर : कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे रुग्णांनी सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी, डोकेदुखी असल्यास तात्काळ चाचणी करून घ्यावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. सध्या जिल्ह्यात डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले आहेत. तर चिकुनगुनियाचे नऊ रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यात डेंग्यू तपासणीसाठी १३ रक्तनमुने घेतले होते. त्यापैकी ३ पॉझिटिव्ह आले होते. या रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाली असून, त्यांना रुग्णालयातून सुटीही मिळाली आहे. - डॉ.आर.आर. शेख, जिल्हा हिवताप अधिकारी
सर्दी, खोकला व ताप
डेंग्यूची आणि कोरोनाची लक्षणे सारखीच आहेत. सर्दी, ताप, खोकला येतो.
अंगदुखी, डोकेदुखी, पोटात दुखणे, मळमळ होणे, डोळ्याच्या पाठीमागचा भाग दुखणे ही लक्षणे डेंग्यूची आहेत.
अशीच लक्षणे कोरोनाचीही आहेत. त्यामुळे ही लक्षणे दिसताच चाचणी करून उपचार करणे गरजेचे आहे.
पाणी उकळून प्या, डासांपासून सावध राहा
सध्या पाऊसकाळ सुरू आहे. डासोत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डेंग्यूचा आजार डासांपासून होतो. त्यामुळे डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करणे गरजेचे आहे.
सध्या पावसाळा असल्याने कोरडा दिवसही पाळता येत नाही. जलजन्य आजार होऊ नयेत, त्यासाठी नागरिकांनी पाणी उकळून प्यावे.
पाण्यामुळेच आजार होतात. त्यामुळे शुद्ध पाणी प्यावे. नळाचे पाणी पित असाल तर उकळून प्यावे, असाही सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.