Corona Vaccination: लातूर शहरातील नागरिकांची बुस्टर डोसकडे पाठ !

By संदीप शिंदे | Published: December 24, 2022 05:57 PM2022-12-24T17:57:15+5:302022-12-24T17:57:55+5:30

Corona Vaccination: गेल्या काही दिवसांपासून चीनसह काही देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून, लसीकरणासह त्रिसुत्रीचा अवलंब करण्याच्या सुचना करण्यात येत आहे.

Corona Vaccination: Citizens of Latur city turn to booster dose! | Corona Vaccination: लातूर शहरातील नागरिकांची बुस्टर डोसकडे पाठ !

Corona Vaccination: लातूर शहरातील नागरिकांची बुस्टर डोसकडे पाठ !

Next

- संदीप शिंदे
लातूर -  गेल्या काही दिवसांपासून चीनसह काही देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून, लसीकरणासह त्रिसुत्रीचा अवलंब करण्याच्या सुचना करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना वेशीवर आला असतानाही शहरातील नागरिकांनी बुस्टर (प्रिकॉशन) डोसकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाला लसीकरणासाठी विशेष शिबिरे आयोजित करावी लागत आहेत.कोरोनापासून संरक्षण मिळविण्यासाठी लसीकरण कवचकुंडल असल्याने लसीकरणावर भर देण्यात आला. शहरात ३ लाख ७० हजार २९० नागरिकांचे लसीकरणासाठी मनपाच्या आरोग्य विभागाला उद्दीष्ट होते. यापैकी ३ लाख ५४ हजार १६८ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस अद्यापर्यंत २ लाख ५४ हजार ५१६ नागरिकांनी घेतला आहे. अद्यापर्यंत १ लाख १५ हजार ७७४ नागरिकांनी दुसऱ्या डोसकडेही कानाडोळा केला आहे. तर आतापर्यंत केवळ २६ हजार ६८४ नागरिकांनीच बुस्टर डोस घेतला आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी महत्वपुर्ण असलेल्या लसीकरणाकडेच शहरातील नागरिकांनी पाठ फिरविली आहे.

कोरोनाची लागण झाली तर त्याची तीव्रता कमी रहावी, यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण आवश्यक आहे. कोरोनाच्या लाटेत मनपा आरोग्य विभागाने युद्धपातळीवर मोहीम राबवित लसीकरणावर भर दिला. मात्र, रुग्णसंख्या घटताच नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली. सध्या चीनसह काही देशात रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. त्यानुसार लसीकरण पुर्ण करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

दरम्यान, ज्यांनी डोस घेतलेला नाही किंवा ज्यांनी दुसरा डोस घेवून सहा महिन्याचा कालावधी पूर्ण होवूनही त्यांनी बुस्टर डोस घेतलेला नाही त्यांनी लवकर लसीकरण करुन घ्यावे. तसेच ६० वर्षावरील नागरीकांनी, रक्तदाब, मधुमेह व इतर गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी त्यांचा प्रिकॉशन डोस प्रलंबित असल्यास त्वरीत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरात १० ठिकाणी लसीकरण...
लातूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मनपा रुग्णालय, पटेल चौक, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, इंडिया नगर, गौतम नगर (खनी भाग), प्रकाश नगर (मनपा शाळा क्रं. २४ जवळ), मंठाळे नगर (मनपा शाळा क्रं. ९ जवळ), राजीव नगर (बाभळगाव रोड ), बौद्ध नगर (यशवंत शाळा, नांदेड रोड जवळ), तावरजा कॉलनी आणि प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र साळे गल्ली (यशवंत विद्यालय, गंजगोलाई) याठिकाणी लसीकरण सुरु राहणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Corona Vaccination: Citizens of Latur city turn to booster dose!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.