कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास माफी नाही; लातूर जिल्ह्यात ५२ नागरिकांविराेधात गुन्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 04:38 PM2022-01-12T16:38:59+5:302022-01-12T16:41:42+5:30

Corona Virus: सार्वजनिक ठिकाणी हाेणारी गर्दी टाळण्यासाठी काेराेना नियमांचे पालन करण्याची गरज आहे. याबाबत प्रशासनाने काही नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Corona Virus: Violation of corona rules; Crime against 52 citizens in Latur district! | कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास माफी नाही; लातूर जिल्ह्यात ५२ नागरिकांविराेधात गुन्हा !

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास माफी नाही; लातूर जिल्ह्यात ५२ नागरिकांविराेधात गुन्हा !

googlenewsNext

लातूर : शासन आणि प्रशासनाने जारी केलेल्या काेराेना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केल्याप्रकरणी लातूर शहरासह जिल्ह्यातील २३ पाेलीस ठाण्यामध्ये ५२ नागरिकांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश डावलत काेराेना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी काेराेनाच्या वाढतील रुग्णसंख्या राेखण्यासाठी निर्बंध जाहीर केले आहेत. या निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी हाेणारी गर्दी टाळण्यासाठी काेराेना नियमांचे पालन करण्याची गरज आहे. याबाबत प्रशासनाने काही नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मास्क अनिवार्य करण्यात आले असून, मॉल-हॉटेल आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी दोन डोस घेतलेल्यांना, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, गर्दी न होऊ देता मास्कचा वापर करत व्यवसाय, दैनंदिन कामकाज करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लातूर शहरातील काही हॉटेल्स, खासगी शिकवणी, पान-टपरी, ऑटोमोबाईल्स, कॉफी शॉप चालक यांच्यासह इतर आस्थापना चालकाकडून नियमांचे पालन होत नसल्याचे समाेर आले आहे. त्यांच्याकडून काेराेना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.

लातूर जिल्ह्यात प्रशासनाने जाहीर केलेल्या काेराेना नियमांचे उल्लंघन करणे, विनामास्क फिरणारे व्यक्ती, गर्दी करुन व्यवसाय करणारे दुकानदार, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता लोकांच्या जीविताला, व्यक्तिगत सुरक्षा धाेक्यात आणणाऱ्या ५२ व्यक्तीविरोधात विरोधात कलम १८८, २६९, २७० भादंवि, कलम ५१ (ब), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, कलम ११, महाराष्ट्र काेविड- १९ उपाययोजना अधिनियम २०२०, कलम २, ३, ४ साथरोग अधिनियम तसेच कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा आणि इतर कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

मास्क, नियमांचे पालन करा...
लातूर शहरासह जिल्ह्यात आता दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्कचा वापर करावा, विनाकारण भटकंती टाळावी, सोशल डिस्टन्स ठेवावा, सॅनिटायझरचा वापर करावा. शिवाय, काेराेना नियमांचे पालन करावेत असे आवाहन पाेलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविराेधात आता थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 
- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक

Web Title: Corona Virus: Violation of corona rules; Crime against 52 citizens in Latur district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.