coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी ४ पॉझिटिव्ह; दोघे मुंबईहून आलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 01:05 AM2020-05-20T01:05:36+5:302020-05-20T01:06:53+5:30
दोघे मुंबईहून आलेले तर दोघे कोरोना बाधितांच्या संपर्कातील आहेत.
लातूर : मंगळवारी रात्री साडेबारा वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार लातूर जिल्ह्यात आणखी ४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात दोघे मुंबईहून आलेले तर दोघे कोरोना बाधितांच्या संपर्कातील आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी १३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहे. पॉझिटिव्ह आलेला एक अहमदपूर तालुक्यातील खंडाळीचा व एक बोरगावचा आहे, दोघेही मुंबईहून आलेले आहेत.
दरम्यान उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात एकुण ३५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले असून त्यात एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह व ३४ अहवाल निगेटीव्ह आहेत, चाकुर येथुन ६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले हाते, ते सर्वच निगेटिव्ह आले आहेत, जळकोट येथील १० व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले, त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून ८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर एका व्यक्तीचा स्वॅब परीपूर्ण न आल्यामुळे रद्द करण्यात आला आहे.
लातुर जिल्हयातील एकुण ६७ स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ४ पॉझिटीव्ह असुन ६१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले तर एक प्रलंबित व एक रद्द झाला आहे, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर, विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.