CoronaVirus : उदगीरमध्ये आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण; लातूर, निलंगामधील सर्व अहवाल निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 10:32 PM2020-05-08T22:32:50+5:302020-05-08T23:29:25+5:30
शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील एकूण ४१ स्वॅबची तपासणी झाल्याचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले.
लातूर : उदगीर येथील एकूण २८ स्वॅबची शुक्रवारी तपासणी करण्यात आली. त्यात १ पॉझिटिव्ह व २६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एकाचा अहवाल पुनर्तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, एकट्या उदगीरमधून आजपर्यंत २२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून, एकूण २८१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील एकूण ४१ स्वॅबची तपासणी झाल्याचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले. त्यामध्ये २८ उदगीर, ९ लातूर आणि ४ निलंगा येथील होते. उदगीरमधील एक पॉझिटिव्ह व एक प्रलंबित वगळता उर्वरित सर्व ३९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण आतापर्यंत ५४९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर यापूर्वीचे आठ कोरोनामुक्त, एक मयत असा एकूण जिल्ह्याचा कोरोना आलेख ३१ वर गेला आहे.