coronavirus : लॉकडाऊन काळात लातुरात जुगार जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 02:29 PM2020-08-10T14:29:35+5:302020-08-10T14:31:11+5:30
पाखरसांगवी परिसरात विनापरवाना बेकायदेशीरपणे लोकांकडून पैसे घेऊन कल्याण नावाचा जुगार खेळताना एकजण आढळून आला.
लातूर : लातूर शहरात १ ऑगस्टपासून कडक लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन दरम्यान, गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पाखरसांगवी तसेच म्हाडा कॉलनी, महाराणा प्रतापनगर या भागात छापा टाकून जुगाऱ्यांना पकडले असून, त्यांच्या जवळील रोख रकमेसह जुगार साहित्य जप्त केले आहे.
पाखरसांगवी परिसरात विनापरवाना बेकायदेशीरपणे लोकांकडून पैसे घेऊन कल्याण नावाचा जुगार खेळताना एकजण आढळून आला. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून जुगार साहित्यासह १ हजार २० रुपयांचा ऐवज जप्त केला. तर म्हाडा कॉलनी, महाराणा प्रताप नगर परिसरात मिलन नाईटचा जुगार खेळविताना आणखी काहीजण आढळून आले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून जुगार साहित्यासह १ हजार ५२० रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.