Coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी ४० रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 07:08 AM2020-07-08T07:08:05+5:302020-07-08T07:08:31+5:30
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ५३९ वर
लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत मंगळवारी २२० स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यात ४० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १५९ जणांचा अहवाल निगेटिव्ह असून, २० प्रलंबित तर एक स्वॅब रद्द करण्यात आला आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये लातूर २१, उदगीर ३, अहमदपूर ५, निलंगा २, औसा ८, कासाशिरसी १ अशा एकूण ४० जणांचा समावेश आहे, अशी माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ५३९ वर गेली असून, मृतांचा आकडा २६ वर गेला आहे. दरम्यान, लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय संस्थेत उपचार सुरू असलेल्या ८४ रुग्णांपैकी ५ जणांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना मंगळवारी सुटी देण्यात आली आहे, अशी माहिती विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंडे यांनी दिली.