Coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी ३० कोरोना रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 05:26 PM2020-07-22T17:26:09+5:302020-07-22T17:36:46+5:30

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये लातूर २१, निलंगा १, चाकूर २, उदगीर ६ अशा एकूण ३० जणांचा समावेश आहे.

Coronavirus In Latur: 30 more patients in the district | Coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी ३० कोरोना रुग्णांची भर

Coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी ३० कोरोना रुग्णांची भर

Next
ठळक मुद्देआतापर्यंत ६६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.सध्या ५२१ रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ४५५ स्वॅबपैकी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर १३० जणांचा अहवाल प्रलंबित आहे. दरम्यान, आतापर्यंत १ हजार २५७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील ६७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ५२१ रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ६६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये लातूर २१, निलंगा १, चाकूर २, उदगीर ६ अशा एकूण ३० जणांचा समावेश आहे. लातूर शहरात केशव नगर, जीएससी रोड लातूर, नांदेड रोड, प्रकाश नगर, क्वाईल नगर, साळे गल्ली, वैभव नगर, हाके नगर, सरस्वती कॉलनी, काळे गल्ली, गांधी नगर, यशवंत सोसायटी, विजय नगर, अंबाजोगाई रोड आदी भागांत रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, ३५ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ८, १२ नं. कोविड सेंटर १३, औसा येथील मुलींची शाळा ५, दापका येथील कोविड सेंटर १, उपजिल्हा रुग्णालय निलंगा १, तोंडार पाटी कोविड सेंटर येथील २, चाकूर येथील कृषी पीजी कॉलेज येथील २, शासकीय वसतिगृह न्यू बिल्डींग देवणी येथील ३ अशा एकूण ३५ जणांचा समावेश आहे.

Web Title: Coronavirus In Latur: 30 more patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.