वीरशैव लिंगायत समाजासाठी स्मशानभूमीची जागा आखून द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:19 AM2021-04-24T04:19:33+5:302021-04-24T04:19:33+5:30
वलांडी येथे सार्वजनिक स्मशानभूमीसाठी ३ हेक्टर ३२ आर जमीन संपादित असून, या जमिनीपैकी वीरशैव लिंगायत समाज व समाजातील पोटजातीतील ...
वलांडी येथे सार्वजनिक स्मशानभूमीसाठी ३ हेक्टर ३२ आर जमीन संपादित असून, या जमिनीपैकी वीरशैव लिंगायत समाज व समाजातील पोटजातीतील कुटुंब संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचाही अंत्यसंस्काराचा विधी हा लिंगायत समाजाप्रमाणेच होतो. वलांडी गावासह इतर गावांतून या समाजाची अनेक कुटुंबे येथे स्थायिक झाली आहेत. त्यांच्यासाठी अंत्यविधीवेळी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समाजासाठी स्वतंत्रपणे असलेल्या स्मशानभूमीतील जागेतील जागा आखून द्यावी, या मागणीचे निवेदन येथील वीरशैव समाजातील व समाजातील पोट जातीतील नागरिकांच्या वतीने सरपंच राणीताई भंडारे यांना देण्यात आले.
निवेदनावर व्यापारी कमिटीचे अध्यक्ष उमाकांत नागलगावे, शिभप संगमेश्वर महाराज, ब्रह्मानंद रटकले, नागनाथ बदनाळे, सुनील चिल्लरगे, सोमनाथ उमाटे, अमोल पाटील, चंद्रशेखर महाजन यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. वीरशैव लिंगायत समाजातील व पोट जातीतील समाजाच्या स्वतंत्र स्मशानभूमी आखून देण्याबाबत लवकरात लवकर शासन स्तरावर प्रयत्न करू. तसेच संरक्षण भिंतीचाही प्रश्न निकाली काढू, असे सरपंच राणीताई भंडारे, ग्रामविकास अधिकारी विष्णू माने यांनी सांगितले.
येण्या बाबतचे निवेदन आज वलांडी ग्रामपंचायतीचे सरपंच राणीताई भंडारे यांना येथील शिष्टमंडळाने दिले.