लातूर शहरामध्ये शवदाहिनीची बॅटरी पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:19 AM2021-08-01T04:19:49+5:302021-08-01T04:19:49+5:30
रहदारीला अडथळा, चालकाविरुद्ध गुन्हा लातूर : शहरातील बार्शी राेड परिसरात रहदारीला अडथळा निर्माण हाेइल अशा स्थितीत वाहन थांबविल्याप्रकरणी वाहनचालकाविराेधात ...
रहदारीला अडथळा, चालकाविरुद्ध गुन्हा
लातूर : शहरातील बार्शी राेड परिसरात रहदारीला अडथळा निर्माण हाेइल अशा स्थितीत वाहन थांबविल्याप्रकरणी वाहनचालकाविराेधात एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी राेड परिसरात रहदारीच्या ठिकाणी आपल्या ताब्यातील ऑटाे एम.एच. २४ ए.टी. २५४४ थांबवून स्वत:सह इतरांच्या जीवितास धाेका निर्माण हाेईल अशा स्थितीत आढळून आला. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात पाेलीस नाईक अर्जुनसिंग हरिसिंग राजपूत (वय ४१, रा. लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वाहनधारकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपाेफाै. जगताप करीत आहेत.
जाेगाळा शिवारातून विद्युत माेटारीची चाेरी
लातूर : शेतालगत असलेल्या ओढ्यातील डाेहात बसविण्यात आलेली पाणबुडी विद्युत माेटार अज्ञात चाेरट्यांनी चाेरून नेल्याची घटना शिरुर अनंतपाळ तालुक्यातील जाेगाळा शिवारात २७ जुलै राेजी घडली. याबाबत शिरुर अनंतपाळ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी शिवाजी नारायणराव माने (वय ६५, रा. जाेगाळा) यांच्या शेतालगत असलेल्या ओढ्यात विद्युत माेटार बसविण्यात आली हाेती. दरम्यान, ती अज्ञातांनी चाेरुन नेली. याबाबत ३० जुलै राेजी शिरुर अनंतपाळ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपाेफाै. पाटील करीत आहेत.
औसा शहरातून दुचाकीची चाेरी
लातूर : औसा येथील तहसील कार्यालय परिसरात थांबविण्यात आलेली माेटारसायकल अज्ञात चाेरट्यांनी पळविल्याची घटना २९ जुलै राेजी घडली. याबाबत औसा पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी सिचन............................ गाेविंद मुळे (३०, रा. सिंदाळा ता. औसा) यांनी आपल्या ताब्यातील माेटारसायकल एम.एच. २४ बी.ए. ९०९७ तहसील कार्यालय परिसरात थांबविली हाेती. ती अज्ञाताने पळविली. याबाबत औसा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेहेकाॅ. औटे करीत आहेत.
रहदारीला अडथळा, जीपचालकावर गुन्हा
लातूर : रहदारीला अडथळा हाेइल अशा स्थितीत वाहन थांबविल्याच्या घटना उदगीर तालुक्यातील हाळी आणि लातूर तालुक्यातील ममदापूर पाटी येथे घडल्या आहेत. याबाबत वाढवणा आणि लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्यात वाहनधारकांविरेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील हाळी येथील प्रमुख रस्त्यावर रहदारीला अथडळा हाेईल, स्वत:सह इतरांच्या जीविताला धाेका निर्माण हाेईल अशा स्थितीत चालकाने आपल्या ताब्यातील जीप एम.एच. २४ इ. ६९३६ थांबविली. याबाबत पाेलीस नाईक तुकाराम त्र्यंबक बळदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत लातूर-नांदेड महामार्गावरील ममदापूर पाटी चाैकात भररस्त्यावर इतरांच्या जीवितास धाेका निर्माण हाेइल, रहदारीला अडथळा निर्माण हाेइल, अशा स्थितीत आपल्या ताब्यातील काळी-पिवळी जीप एम.एच. २४ एफ. १४०७ थांबवून प्रवासी घेत असताना आढळून आला. याबाबत लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्यात नागनाथ प्रल्हाद पांढरे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णालय परिसरातून माेटारसायकलची चाेरी
लातूर : रुग्णालयात परिसरात थांबविण्यात आलेली माेटारसायकल अज्ञाताने पळविल्याची घटना दयानंद गेट परिसरात घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी विशाल आदिनाथ दहिफळे (२४, रा. कन्हेरी चाैक, लातूर) यांनी आपल्या ताब्यातील माेटारसायकल एम.एच. ३८ के. ७१४२ एका रुग्णालय परिसरात थांबविली हाेती. दरम्यान, ती अज्ञात चाेरट्यांनी चाेरुन नेल्याची घटना २१ जुलै राेजी घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.