Crime News : लातूरात भरदिवसा कोयत्याने सपासप वार करुन विद्यार्थ्याचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 06:52 PM2022-01-23T18:52:37+5:302022-01-23T18:52:53+5:30

लातुरात खळबळ, पोलीस अॅक्शन मोडमध्ये

Crime New Latur Student murdered by stabbing police now in action mode some friends arrested | Crime News : लातूरात भरदिवसा कोयत्याने सपासप वार करुन विद्यार्थ्याचा खून

Crime News : लातूरात भरदिवसा कोयत्याने सपासप वार करुन विद्यार्थ्याचा खून

googlenewsNext

लातूर : इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यावर भरदिवसा कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. लातुरातील विशाल नगर भागात असलेलया श्री साई मंदिर लगत भर रस्त्यावर विद्यार्थ्यावर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी पाच संशयित मित्रांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लातूर शहरातील मोती नगर भागात वास्तव्याला असलेला रोहन सुरेश उजळंबे (२०) हा मुळचा लोदगा (ता. औसा) येथील रहिवासी आहे. तो इयत्ता बारावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. दरम्यान, विशाल नगरातील साई मंदिराशेजारच्या रस्त्यावर रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारा तो थांबवला होता. यावेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने रोहनच्या गळ्यावर सपासप वार केले. अचानकपणे झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि जमिनीवर कोसळला. काही समजायच्या आतच मारेकरी मोटरसायकलवरुन पासर झाल्याचे प्रत्यक्षर्शींनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

भरदिवसा घडलेल्या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली. घटनेमुळे दुकानदारांनी तातडीने दुकानंही बंद केली. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळाली असता, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक संजिवन मिरकले यांनी घटनास्थळी भेट दिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहन उजळंबे याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

संशयीत मित्रांना घेतले ताब्यात...
पोलिसांनी तातडीने त्याच्या वर्तुळातील पाच मित्रांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. खुनामागचे कारण मात्र, अद्याप समोर आले नाही. मयत रोहन उजळंबे आणि मारेकऱ्यामध्ये नेमका काय वाद होता? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. आरोपी निष्पन्न झाल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे.
- निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, लातूर

सीसीटीव्ही फुटेजची पाहणी...
विशालनगर परिसरातील हा परिसर साई मंदिरामुळे अत्यंत वर्दळीचा, गजबजलेला असतो. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. मयत रोहन हा येथे कशासाठी आला होता? मारेकरी त्याच्या मागावर होते का? याचाही तपास सुरु आहे. भर दुपारी दिवसा मारेकऱ्याने रोहनवर कोयत्याने हल्ला केला. घटनास्थळावर पडलेला कोयता, सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहेत.

Web Title: Crime New Latur Student murdered by stabbing police now in action mode some friends arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.