Crime News: लातुरातील सराईत गुन्हेगार ‘एमपीडीए’नुसार स्थानबद्ध, पाेलीस अधीक्षक साेमय मुंडे यांचा झटका

By राजकुमार जोंधळे | Published: December 24, 2022 05:54 PM2022-12-24T17:54:03+5:302022-12-24T17:54:35+5:30

Crime News: वाढत्या गुन्हेगारीला राेखण्यासाठी पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांच्या आदेशान्वये एमआयडीसी पाेलिसांनी महाराष्ट्र झाेपडपट्टी दादा (एमपीडीए) कायद्यान्वये एका खतरनाक गुंडावर कारवाई केली.

Crime News: Sarai criminals in Latur arrested as per 'MPDA', Superintendent of Police Samey Munde's attack | Crime News: लातुरातील सराईत गुन्हेगार ‘एमपीडीए’नुसार स्थानबद्ध, पाेलीस अधीक्षक साेमय मुंडे यांचा झटका

Crime News: लातुरातील सराईत गुन्हेगार ‘एमपीडीए’नुसार स्थानबद्ध, पाेलीस अधीक्षक साेमय मुंडे यांचा झटका

googlenewsNext

- राजकुमार जोंधळे
लातूर - वाढत्या गुन्हेगारीला राेखण्यासाठी पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांच्या आदेशान्वये एमआयडीसी पाेलिसांनी महाराष्ट्र झाेपडपट्टी दादा (एमपीडीए) कायद्यान्वये एका खतरनाक गुंडावर कारवाई केली. सार्वजनिक शांतता धाेक्यात असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी स्थानबद्धतेच्या कारवाईचा प्रस्ताव मंजूर केला. सराईत गुंडाला ‘एमपीडीए’खाली स्थानबद्ध करण्याची केलेली कारवाई लातूर जिल्ह्यातील पहिलीच आहे.

लातुरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी, त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी एमपीडीए कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. वाढणाऱ्या गुन्हेगारीला राेखण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यांतर्गत आकाश अण्णासाहेब होदाडे (वय २५, रा. कवठा ता. औसा, ह. मु. न्यू भाग्यनगर, लातूर) याच्यावर कारवाई केली. एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आकाश अण्णासाहेब होदाडे याला ‘एमपीडीए’ कायद्याखाली एका वर्षासाठी स्थानबद्ध करुन, जिल्हा कारागृहात रवानगी केली. त्याच्यावर खून, जीवे मारण्याचा प्रयत्न, कट रचून-भीती घालून खंडणी उकळणे, मालमत्तेचे नुकसान, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, दहशत निर्माण करून मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशीर जमाव गोळा करून दहशत करणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्याच्याकडून सार्वजनिक शांततेस धोका असल्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरी पाठविला होता. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला.

काय आहे एमपीडीए कायदा..?
महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अक्टिव्हिटी) होय. सराईत गुन्हेगार, सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध अशी कारवाई करता येते. यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करता येते.

Web Title: Crime News: Sarai criminals in Latur arrested as per 'MPDA', Superintendent of Police Samey Munde's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.