पावसाअभावी पिकांचे नुकसान; पंचनामे करून मदत द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:24 AM2021-08-13T04:24:19+5:302021-08-13T04:24:19+5:30
मुरुड परिसरात यंदा वेळेवर पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. साेयाबीनसह सर्व पिके बहरली होती; परंतु ...
मुरुड परिसरात यंदा वेळेवर पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. साेयाबीनसह सर्व पिके बहरली होती; परंतु पावसाने उघडीप दिल्यामुळे पिके कोमेजून जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. अगोदरच आर्थिक संकट असलेल्या शेतकऱ्यांवर नवे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब काळे, तालुका उपाध्यक्ष विष्णू देशमुख, युवक आघाडी तालुका प्रमुख समाधान शिंदे, सचिव पवन नाडे, खंडू पवार, खंडू आवटे, कृष्णा माचवे, गणेश भिसे, गणेश शिंदे, सारंग कदम, बालासाहेब काळे, लहु कणसे, श्रीनाथ कणसे, गोविंद देशमुख, सुमन मांदळे यांची उपस्थिती होती.