एकाच साडीने दाेघी बहिणींनी घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:39+5:302021-07-04T04:14:39+5:30
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरालगत हरंगुळ राेड परिसरात गाेविंद नगरात विश्वकर्मा मंदिराच्या लगत एक कुटुंब वास्तव्याला आहे. त्यांचे स्वत:चे घर ...
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरालगत हरंगुळ राेड परिसरात गाेविंद नगरात विश्वकर्मा मंदिराच्या लगत एक कुटुंब वास्तव्याला आहे. त्यांचे स्वत:चे घर आहे़ शनिवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास गीतांजली दत्तात्रय बनसाेडे आणि धनश्री संतराम क्षीरसागर या दाेघी मावस बहिणी तळमजल्यातून आम्ही वरच्या पहिल्या मजल्यावर कपडे धुताे, असे म्हणून गेल्या हाेत्या़ काही वेळातच त्यांनी पहिल्या मजल्यावर असलेल्या खाेलीच्या आडूला एकाच साडीने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या गीतांजली बनसाेडे हिचे वय १७ वर्षे ८ महिने आहे. धनश्री क्षीरसागरचे वय २० वर्षे आहे. दरम्यान, दाेघींचेही कुटुंब घरातच हाेते. धुणे धुण्याच्या बहाण्याने वरच्या मजल्यावर गेलेल्या या मुली आत्महत्या करतील असे त्यांच्या कुटुंबातील काेणालाही वाटले नाही. असे एमआयडीसी पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी सांगितले. सध्या या आत्महत्येबाबत काेणतेही प्राथमिक कारण हाती आले नाही, असेही सांगण्यात आले. अधिक तपास एमआयडीसी पाेलीस करीत आहेत. याबबात एमआयडीसी पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
घटनास्थळी अप्पर पाेलीस अधीक्षक हिम्मत जाधव, लातूर शहर उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पाेलीस उपनिरीक्षक कल्याण नेहरकर यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट हाेणार आहे.