दुचाकी-चारचाकी वाहनांचे नुकसान; एकाविराेधात गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Published: February 6, 2024 10:12 PM2024-02-06T22:12:57+5:302024-02-06T22:13:21+5:30

याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Damage to two-four wheelers; A crime against one | दुचाकी-चारचाकी वाहनांचे नुकसान; एकाविराेधात गुन्हा

दुचाकी-चारचाकी वाहनांचे नुकसान; एकाविराेधात गुन्हा

राजकुमार जाेंधळे / लातूर : रस्त्यालगत पार्किंग करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी, कारला ठाेकून जवळपास दाने लाखांचे नुकसान केल्याची घटना लातुरातील बाेधेनगर भागात घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर शहरातील बाेधेनगर येथील सोमनाथ व्यंकट दिक्षित (वय ३५) यांनी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, चालक रंजनकुमार श्रीनिवास देशमुख (वय २३, रा. गजानन नगर, लातूर) याने आपल्या ताब्यातील कारने (एम.एच. २४ ए.एफ. ८४४३) फिर्यादीच्या वाहनाच्या बाजूने पार्किंग केलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी आणि कारला हयगय व निष्काळजीपणे भरधाव चालून जाेराची धडक दिली. यामध्ये जवळपास २ लाख १० हजारांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली. 

याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुरनं. ७५ / २०२४ कलम २७९, ४२७ भादंविप्रमाणे, कलम १८४, १८५ माेटारवाहन कायद्यानुसार रंजनकुमार देशमुख याच्या विराेधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पाेलिस निरीक्षक दिलीप सागर यांनी दिली. तपास पाेलिस उपनिरीक्षक लटपटे करत आहेत.

Web Title: Damage to two-four wheelers; A crime against one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.