रात्री हळदीच्या कार्यक्रमात तलवारीसह नाच केला; लग्नाच्या दिवशी जेलची हवा खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 11:48 AM2022-02-21T11:48:41+5:302022-02-21T11:52:41+5:30

तलवारीसह नाचणाऱ्या १५ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

dancing with Swords in the Haladi ceremony at Latur; Five arrested | रात्री हळदीच्या कार्यक्रमात तलवारीसह नाच केला; लग्नाच्या दिवशी जेलची हवा खाली

रात्री हळदीच्या कार्यक्रमात तलवारीसह नाच केला; लग्नाच्या दिवशी जेलची हवा खाली

Next

लातूर : शहरातील एलआयसी काॅलनी परिसरात एका लग्न साेहळ्याच्या पूर्वसंध्येला हळदी कार्यक्रमात हातात तलवार, कत्तीसह धारदार शस्त्र घेवून नाचणाऱ्या १५ जणांविराेधात विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. 

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील एलआयसी काॅलनी परिसरात वास्तव्याला असणाऱ्या शुभम तुमकुटे याच्या लग्नसाेहळ्याच्या पूर्वसंध्येला हळदीच्या कार्यक्रमात धारदार शस्त्र तलवार, कत्ती हातात घेवून सार्वजिनक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याचबराेबर इतरांनी गाेंधळ, धिंगाणा घालत, माेठ्या आवाजात गाणे लावून नाचताना जवळपास १५ जण आढळून आले. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात पाेलीस नाईक विनाेद ज्ञानाेबा चलवाड (२९ रा. लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मनाेज अशाेक धाेत्रे (२३ रा. गाेपाळ नगर, लातूर), सुशांत दत्तात्रय जाधव (रा. एलआयसी काॅलनी, लातूर), बालाजी सखाराम दणदिवे (रा. गाेपाळनगर, लातूर), रणजित रमेश माेहिते (रा. एलआयसी काॅलनी, लातूर), अमर बाळासाहेब ढाेणे (रा. एलआयसी काॅलनी, लातूर), सलीम रज्जाक शेख (रा. एलआयसी काॅलनी, लातूर), शुभम तुमकुटे (रा. एलआयसी काॅलनी, लातूर) याच्यासह इतर सहा ते सात जणांविराेधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, लातूर शहर उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, परिविक्षाधीन पाेलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पाेलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पाेलीस कर्मचारी संजय कांबळे, दयानंद साराेळे, मुन्ना नलवाड, दिनेश हवा, नारायण शिंदे यांच्या पथकाने केली.

Web Title: dancing with Swords in the Haladi ceremony at Latur; Five arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.