झुकलेल्या विद्युत खांबामुळे धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:55 AM2021-02-20T04:55:33+5:302021-02-20T04:55:33+5:30
तालुक्यातील दैठणा येथील बालाजी सामनगावे यांच्या शेतातून शेंद गावासाठी मुख्य विद्युत वाहिनी गेली आहे. परंतु, परतीच्या पावसात एक ...
तालुक्यातील दैठणा येथील बालाजी सामनगावे यांच्या शेतातून शेंद गावासाठी मुख्य विद्युत वाहिनी गेली आहे. परंतु, परतीच्या पावसात एक विजेचा खांब झुकला आहे. विजेच्या तारा लोंबकळत आहेत. त्याचा मशागतीची कामे करताना शेतकऱ्याच्या जीवितास धोका निर्माण झाला. त्यामुळे बालाजी सामनगावे यानी या विजेच्या खांबाची दुरूस्ती करण्यात यावी म्हणून महावितरण कार्यालयात खेटे घातले. वारंवार निवेदन देऊन दुरूस्तीची मागणी केली. परंतु विद्युत खांबाची दुरूस्ती झाली नाही. कोणत्याही क्षणी हा विद्युत खांब कोसळून धोका होण्याची भीती निर्माण झाली आहे. या विजेच्या खांबाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
पाहणी करून दुरूस्ती...
याबाबत दैठणा येथील लाईनमन भद्रे म्हणाले, पाहणी करून नवीन विजेचा खांब बसविण्यात येईल. लवकरच ही कार्यवाही करण्यात येईल.