आठवड्याभरापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडला; सोबत तरुणाचंही प्रेत आढळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 11:24 PM2022-03-11T23:24:40+5:302022-03-11T23:28:49+5:30
विहिरीत बुडाल्यानं तरुण तरुणीचा मृत्यू; पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद
अहमदपूर (जि. लातूर) : लातूर शहरातील न्यू भाग्यनगर येथील रहिवासी असलेल्या युवक-युवतीने अहमदपूर तालुक्यातील गुगदळ शिवारातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. दरम्यान शुक्रवारी दुपारनंतर ही घटना उघडकीस आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, १९ वर्षीय साेनम ५ मार्च राेजी सकाळी ११.३० वाजता ब्यूटी पार्लरला जात आहे म्हणून घरातून बाहेर पडली. दुपारी ३ वाजता तिच्याशी दूरध्वनीवर संपर्क झाला. त्यावेळी तिने विवेकानंद चाैक येथे असल्याचे सांगितले हाेते. मात्र, ती उशिरापर्यंत घरी आली नाही. नातेवाईकांनी दाेन दिवस शाेधाशाेध केली. अखेर ७ मार्च राेजी विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात साेनम हरवल्याची नाेंद करण्यात आली. दरम्यान, ११ मार्च राेजी अहमदपूर तालुक्यातील गुगदळ शिवारातील एका विहिरीत साेनम तसेच एका तरुणाचे प्रेत विहिरीत आढळून आले. त्या तरुणाची ओळख पटली असून, ताेही न्यू भाग्यनगर येथील १९ वर्षीय अभिजित केदार शिंदे असल्याचे पाेलिसांनी सांगितले. या प्रकरणात साेनमचे काका संताेष सज्जनराव मादंळे यांनी पाेलिसात फिर्याद दिली हाेती. दरम्यान, दाेन्ही मयत युवक-युवतीचे शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहायक पाेलीस निरीक्षक रामचंद्र केदार, उपनिरीक्षक बालाजी पल्लेवाड, काॅन्स्टेबल प्रशांत किर्ते, आरदवाड, कावळे, राजगीरवाड तसेच पाेहकाॅ. व्ही. जी. समुखराव यांनी तपास कार्य केले. पुढील तपास पाेलीस निरीक्षक चिदांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाकर अंधाेरीकर करीत आहेत.
युवक-युवतीच्या मृत्यूचे कारण
विहिरीत बुडाल्याने दाेघांचाही मृत्यू झाला असून, पाेलिसात आकस्मात मृत्यूची नाेंद झाली आहे. परंतु, त्या दाेघांनी उडी मारुन आत्महत्या केली की, आणखी काय घडले, याबाबत पाेलीस तपास करीत असून, घटनेचे स्पष्ट कारण समाेर आलेले नाही.