विजेच्या धक्क्याने सालगड्याचा मृत्यू, लातूर जिल्ह्यातील येल्लोरीची घटना
By राजकुमार जोंधळे | Published: April 17, 2024 10:10 PM2024-04-17T22:10:33+5:302024-04-17T22:11:07+5:30
याबाबत भादा पाेलिस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली आहे.
राजकुमार जाेंधळे / औसा (जि. लातूर) : तलावातील पाण्याचा उपसा करताना एका सालगड्याचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना येल्लाेरी (ता. औसा) शिवारात घडली. दत्तात्रय साधू बेडगे (वय ४६) असे मयत सालगड्याचे नाव आहे. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, यल्लाेरी येथील एका शेतकऱ्यांकडे मयत दत्तात्रय साधू बेडगे हे सालगडी म्हणून सध्याला काम करत हाेते. दरम्यान, ते शेतालगत असलेल्या साठवण तलावातून रात्रीच्या वेळी ते विद्युत माेटारीच्या सहायाने पाण्याचा उपसा करत हाेते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास पाण्याचा उपसा करताना वीजेच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पाेलिस निरीक्षक राहुलकुमार भोळ यांनी दिली.
बंदीनंतरही केला पाण्याचा उपसा...
येल्लोरी येथील साठवण तलावावरील विद्युत माेटारी बंद केल्या असून, येथील पाणी उपशावर बंदी घातली आहे. मात्र, काही जण चुकीच्या पध्दतीने पाण्याचा उपसा करत असल्याचे समाेर आले आहे. अशा प्रकारातून ही घटना घडल्याचे शाखा अभियंता व्ही. के. नागराळे म्हणाले.