जिल्हा बँकेच्या एटीएम व्हॅनचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:19 AM2021-08-01T04:19:34+5:302021-08-01T04:19:34+5:30
यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन ॲड. श्रीपतराव काकडे, व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, संचालक एस.आर. देशमुख, अशोकराव पाटील ...
यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन ॲड. श्रीपतराव काकडे, व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, संचालक एस.आर. देशमुख, अशोकराव पाटील निलंगेकर, नाथसिंह देशमुख, भगवानराव पाटील विजयनगरकर, संभाजीराव सुळ, ॲड. प्रमोद जाधव, एन.आर. पाटील, सुधाकर रुकमे, व्यंकटराव बिरादार, धर्मपाल देवशेट्टे, स्वयंप्रभा पाटील, शिवकन्या पिंपळे, यशवंतराव पाटील, संजय बोरा, कार्यकारी संचालक हणमंत जाधव, सरव्यवस्थापक सी.एन. उगिले, तानाजी जाधव, हरिराम कुलकर्णी आदींसह बँकेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
ग्राहकांना मिळणार तात्काळ सेवा...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मातृसंस्था असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवडी बाजार, बँकेची शाखा नाही अशा ठिकाणी मोबाईल व्हॅनची सेवा देण्यात येणार आहे. या माध्यमांतून ग्राहकांना जागेवरच पैसे भरणे तसेच एटीएमद्वारे पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना तात्काळ सेवा मिळणार असल्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले.