आक्का फाऊंडेशतर्फे उपजिल्हा रुग्णालयात दोन बायोपाईप मशीनचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:18 AM2021-05-15T04:18:25+5:302021-05-15T04:18:25+5:30

येथील उपजिल्हा रुग्णालयात आक्का फाऊंडेशनच्यावतीने दोन बायोपाईप मशीनचे लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ...

Dedication of two biopipe machines in the sub-district hospital by Akka Foundation | आक्का फाऊंडेशतर्फे उपजिल्हा रुग्णालयात दोन बायोपाईप मशीनचे लोकार्पण

आक्का फाऊंडेशतर्फे उपजिल्हा रुग्णालयात दोन बायोपाईप मशीनचे लोकार्पण

Next

येथील उपजिल्हा रुग्णालयात आक्का फाऊंडेशनच्यावतीने दोन बायोपाईप मशीनचे लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सौंदाळे, अरविंद पाटील-निलंगेकर, जि. प. उपाध्यक्षा भारतबाई साळुंके, जि. प. सदस्य संजय दोरवे, चेअरमन दगडू साळुंके, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, डॉ. पी. पी. सोळुंके, डॉ. बरूरे, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते आदींची उपस्थिती होती.

यावेळी माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी कोरोना संसर्गाचा आढावा घेत उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह शहरातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सध्याच्या संकटकाळात सर्वांनी एकत्रित येऊन एकदिलाने व एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय यंत्रणा कमी पडू नये, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असून शहरातील खासगी डॉक्टरांनीही उपजिल्हा रुग्णालयात येऊन आरोग्य सेवा करावी, अशी अपेक्षा आ. निलंगेकरांनी व्यक्त केली.

आरोग्य सेवेत सर्वांत महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या परिचारिकांचे कौतुक करत त्यांनी परिचारिकांची संख्या वाढविण्यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत, असे सांगितले.

लवकरच आणखीन तीन बायोपाईप...

निलंगा उपजिल्हा रुग्णालय हे १०० खाटांचे होते. ते आपण आता २०० खाटापर्यंत नेले असून यातील ८५ खाटा ऑक्सिजनयुक्त असल्याचे आक्का फाऊंडेशन व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दोन बायोपाईप मशीनचे लोकार्पण करण्यात आले आहे. लवकरच आणखीन तीन बायोपाईप उपलब्ध करून देणार असल्याची माहिती माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी दिली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम कशी होईल, यासाठी आपण प्रयत्न करत असून त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आक्का फाऊंडेशनही त्यासाठी बांधील असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Dedication of two biopipe machines in the sub-district hospital by Akka Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.