लातूरची लढाई दिल्लीची अन् चर्चा गल्लीची!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:37 AM2019-04-17T04:37:44+5:302019-04-17T04:38:13+5:30

लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत आणि भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृगांरे यांच्यातच आहे.

Delhi's discussion of Latur is discussed in the street! | लातूरची लढाई दिल्लीची अन् चर्चा गल्लीची!

लातूरची लढाई दिल्लीची अन् चर्चा गल्लीची!

Next

लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत आणि भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृगांरे यांच्यातच आहे. शिवाय, या लढतीला मंत्री संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध आ. अमित देशमुख असे स्वरूप आल्याने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकेका मतासाठी जिवाचे रान करत आहेत.
>कर्जमाफी, नोटाबंदी बेरोजगारीवर भर
गेली पाच वर्षे केंद्र व राज्यात सत्ता असताना भाजपने केवळ घोषणाबाजी केली़ बेरोजगारी वाढविली़ कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव दिला नाही़ जाती, धर्माच्या नावाने राजकारण केले़ समाजात सौहार्द ठेवले नाही, नोटाबंदी, जीएसटीने व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आदी मुद्दे काँग्रेसकडून प्रचारात प्रकर्षाने मांडण्यात आले़
देशभक्ती आणि राष्ट्राचा विकास
भाजपने स्थानिक मुद्द्यांबरोबरच राष्ट्रहित आणि राष्ट्राचा विकास या मुद्द्यांना प्राधान्य दिले़ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित राहील, यावरच अधिक भर देण्यात आला़ राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेबोगीचा कारखाना भाजपच्या सत्ताकाळात आल्याचा मुद्दाही प्रचारात मांडण्यात आला़ लातूरच्या पाणीटंचाईवरही भर देण्यात आला़
>हेही रिंगणात
वंचित आघाडीकडून राम गारकर, बसपाचे सिद्धार्थ सूर्यवंशी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अरुण सोनटक्के, बहुजन मुक्ती पार्टीचे दत्तू करंजीकर, स्वतंत्र भारत पक्षाचे रूपेश शंके, मधुकर कांबळे, पपिता रणदिवे, रमेश कांबळे हे रिंगणात आहेत़

Web Title: Delhi's discussion of Latur is discussed in the street!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.