केळगाव येथे रस्ता दुभाजक निर्माण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:21 AM2021-07-31T04:21:10+5:302021-07-31T04:21:10+5:30
केळगाव हे ५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात पाच शाळा आहेत. त्यामुळे परिसरातील राठोडा, बुजरुकवाडी, कलांडी, निटूर, डांगेवाडी, लांबोटा, ...
केळगाव हे ५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात पाच शाळा आहेत. त्यामुळे परिसरातील राठोडा, बुजरुकवाडी, कलांडी, निटूर, डांगेवाडी, लांबोटा, झरी, काटे जवळगा, जाजनूर, बसपूर, खडक उमरगा येथील विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. तसेच सतत रेलचेल असते. परंतु, येथील महामार्गावर रस्ता दुभाजक, फुटपाथ व नाल्याचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, महामार्गावर लहान गावे असलेल्या गौर, आनंदवाडी, निटूर (मोड), म्हसोबावाडी, हंगरगा येथे ही कामे झाली आहेत.
येथेही रस्ता दुभाजक, फुटपाथ व नालीचे काम करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश लांबोटे, शेरे हिंद टिपू सुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर, गोर सेनेचे तालुकाध्यक्ष आकाश राठोड, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे, एमआयएमचे तालुकाध्यक्ष सय्यद शाहरुख, ऑल इंडिया पँथर सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मेघराज जेवळीकर, विकास सूर्यवंशी, ग्रामस्थ डी.एन. कांबळे, भरत चव्हाण, रावसाहेब मुगळे, रावण कांबळे, किसन पाटील, प्रकाश सूर्यवंशी, किशोर कांबळे, शंकर चव्हाण, सुनील राठोड, अनिल राठोड, बालाजी कांबळे आदी उपस्थित होते.